Big News पुणे, ता. 18 : शहरातील दोन नामांकित विकासकांमधील बहुचर्चित वादाला आता मोठे वळण मिळाले आहे. पुणे प्रथमवर्ग न्यायालयाने विमाननगर पोलिसांना रुणवाल एंटरप्रायझेसचे संचालक सुबोध रुणवाल, आशुतोष नवरे, ल्युसी रॉय चौधरी, एम.बी. अग्रवाल अँड कंपनीसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. Big News
न्यायालयाने भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि कटकारस्थानाशी संबंधित विविध कलमांखाली प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात न्यायालयाने विमाननगर पोलिसांच्या भूमिकेवरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. Big News
न्यायालयाने मागवूनही पोलिसांकडून कोणताही अहवाल किंवा म्हणणे सादर करण्यात आले नसल्याची गंभीर दखल घेत, “या प्रकरणात सखोल पोलिस तपास आवश्यक आहे,” असे स्पष्ट नमूद केले. त्यामुळे पोलिसांच्या निष्क्रियतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Big News
तक्रारदार रणजीत दरक यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, संबंधित विकासकांनी संयुक्त विकास करारातील अटींचे उल्लंघन करत विकास हक्क बेकायदेशीररित्या हस्तांतरित केले. आवश्यक परवानग्या न घेता व्यवहार करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. Big News
तसेच, दिवंगत सतीश मित्तल यांच्या निधनानंतर त्यांच्या कायदेशीर वारसांना डावलून आर्थिक आणि करसंबंधित कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पुण्यातील प्रकल्प आणि जमीन व्यवहाराशी संबंधित बाबी असताना चुकीची माहिती देत मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. Big News
या आदेशानंतर पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता विमाननगर पोलीस या प्रकरणात कोणती कारवाई करतात आणि तपासातून नेमके काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





