Monday, May 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण हिट अँड रन! अपघातात उरुळी कांचन येथील कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 May 2026, 11:28
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Pune Solapur Highway  उरुळी कांचन, ता. १८ : पुणे-सोलापूर महामार्गावर पुन्हा एकदा भरधाव वाहनाचा कहर पाहायला मिळाला आहे. भांडगाव परिसरात भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक देत भीषण अपघात घडवला. या अपघातात पती-पत्नी आणि त्यांचा ९ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले असून, अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. Pune Solapur Highway

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली अनिल शेलार (वय २६), त्यांचे पती अनिल लक्ष्मण शेलार आणि मुलगा श्रेयश (वय ९) हे शनिवारी पहाटे उरुळी कांचन येथून जामखेडकडे निघाले होते. हिरो होंडा फॅशन (MH12/FE/4755) या दुचाकीवरून प्रवास सुरू असताना सकाळी सुमारे ७.१५ वाजता भांडगाव येथील टेस्ट बाईट कंपनीसमोर मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. Pune Solapur Highway

 

धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातात सोनाली शेलार यांच्या डोक्याला, तोंडाला आणि पायाला दुखापत झाली असून, अनिल शेलार यांच्या डोक्याला तसेच हात-पायांना गंभीर मार लागला आहे. तर ९ वर्षीय श्रेयशच्या हातापायांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर काही क्षण परिसरात एकच गोंधळ उडाला होता. Pune Solapur Highway

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. जखमींना तातडीने यवत येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र धडक देणारा वाहनचालक वाहन न थांबवता पसार झाला. या घटनेमुळे महामार्गावरील बेफाम वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. “धडक द्या आणि पळा” अशा प्रकारांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सोनाली शेलार यांच्या फिर्यादीवरून यवत पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भापकर करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Big News : पुण्यातील बांधकाम क्षेत्रात खळबळ! नामांकित विकासकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश; विमाननगर पोलिसांवरही ताशेरे

Monday, 18 May 2026, 11:39
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Pune Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण हिट अँड रन! अपघातात उरुळी कांचन येथील कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

Monday, 18 May 2026, 11:28

Daund News : योगेश कोंडे कुठे आहे? म्हणत महिलेकडून मोटार रिवाइंडिंग दुकानात धुडगूस; दगडफेकीत कानगावातील युवक जखमी

Monday, 18 May 2026, 11:03

Yavat News : रस्त्यात वाहने टाकून पसार होणाऱ्यांसह मद्यधुंद चालकांवर गुन्हे दाखल

Monday, 18 May 2026, 10:48

Junnar News : जुन्नरममध्ये बस थेट खड्ड्यात कोसळली, चालकासह प्रवाशाचा मृत्यू, २० जण जखमी

Monday, 18 May 2026, 10:04

Pune News : पुण्यात नात्यालाच तडा! आजोबांकडून ९ वर्षीय नातीवर अत्याचार; येवलेवाडीतील घटनेने संतापाची लाट

Monday, 18 May 2026, 9:49
Next Post

Big News : पुण्यातील बांधकाम क्षेत्रात खळबळ! नामांकित विकासकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश; विमाननगर पोलिसांवरही ताशेरे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.