Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan : तक्रारवाडी स्मशानभूमी अंधारातच; पुनर्वसनानंतरही विजेची सोय नाही, अंत्यविधीवेळी मोबाईल टॉर्चचा आधार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 February 2026, 13:51
Bhigwan

photo- ppn

भिगवण(प्रतिनिधी) 

 

Bhigwan : “मृत्यूनंतर किमान सन्मानजनक अंतिम निरोप मिळावा” हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत मानवी हक्क मानला जातो. मात्र तक्रारवाडी येथील स्मशानभूमी आजही अंधारात असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाईकांची मोठी कुचंबणा होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. विजेची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने अनेकांना रात्रीच्या वेळी मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात अंत्यविधी पार पाडावे लागत आहेत.

पुनर्वसित गाव, पण स्मशानभूमी मात्र दुर्लक्षित

तक्रारवाडी हे पुनर्वसित गाव असून गावाची स्मशानभूमी उजनी धरणाच्या पाणीफुगवठ्याजवळ, गावापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. गेली अनेक दशके या ठिकाणी वीजपुरवठ्याची कोणतीही ठोस सोय करण्यात आलेली नाही. दरम्यान अनेक सरपंच सत्तेत आले-गेले; कार्यकाळ पूर्ण करून बाजूला झाले. परंतु स्मशानभूमीतील अंधार दूर करण्याचे धाडस किंवा प्राधान्य कुणीही दिले नाही, अशी ग्रामस्थांची नाराजी आहे.

सोलर हायमास्टही ठरले अपयशी

मध्यंतरी तात्पुरत्या उपाययोजनेतून सोलर हायमास्ट दिवे बसवण्यात आले होते. मात्र काही दिवसांतच हे दिवे बंद पडले. बसविण्याचे काम दिलेल्या ठेकेदाराने त्यांची दुरुस्ती करण्यासाठी कोणतीही पुढाकार घेतला नाही, असा आरोप नागरिक करत आहेत. बंद पडलेले दिवे आजही तिथेच निष्प्रभ उभे असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अंत्यविधीवेळी मंत्र्यांनाही टॉर्चचा आधार

नुकताच एका अंत्यविधीप्रसंगी दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. मात्र स्मशानभूमीत दिवाबत्तीची सोय नसल्याने त्यांनाही काही अंतर मोबाईल टॉर्चच्या उजेडात चालत जावे लागले. राज्याचे मंत्री उपस्थित असतानाही अशी परिस्थिती निर्माण होणे ही तक्रारवाडीकरांसाठी लाजिरवाणी बाब असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

राजकारणाला प्राधान्य, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष?

स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी वीजपुरवठा, रस्ता, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. मात्र सत्तेच्या खुर्चीसाठी धावपळ करणाऱ्या लोकप्रतिनिधींना गावातील ही खरी अडचण दिसत नाही का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

“अंधार दूर करणारा प्रतिनिधी हवा”

कित्येक वर्षांपासून अंधारात असलेल्या या स्मशानभूमीला कायमस्वरूपी वीजपुरवठा मिळावा, सोलर दिव्यांची दुरुस्ती व्हावी किंवा नवीन व्यवस्था उभी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. “गावाच्या वेदना समजून घेणारा आणि स्मशानभूमीला उजेड देणारा सरपंच किंवा सदस्य मिळावा,” अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
तक्रारवाडीतील ही परिस्थिती केवळ प्रशासकीय दुर्लक्षाचे उदाहरण नसून मानवी संवेदनांनाही काळिमा फासणारी आहे. आता तरी संबंधित यंत्रणा जागी होणार का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

Accident News: भीषण अपघात! भरधाव ट्रकची पोलिसांच्या बोलेरोला धडक, 5 पोलिसांचा जागीच मृत्यू तर 3 जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.