नवी दिल्ली : सध्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक नवनव्या गॅजेट्स वापरण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यापैकी स्मार्टफोन हा एक आहे. देशात बहुतांश जणांकडे स्मार्टफोन आहेच. पण असे काही जण आहेत त्यांना तो स्मार्टफोन घ्यायचा तर असेल, मात्र पैसे जास्त असल्याने काय करावं समजत नाही. पण आता आम्ही तुम्हाला सात हजार रुपयांपेक्षा कमी किमतीतील स्मार्टफोनचे पर्याय सांगणार आहोत.

नोकिया C12 Pro

नोकिया C12 Pro हा एक बजेट स्मार्टफोन आहे. हा अँड्राईड 12 (Go एडीशन) वर चालतो. तर यामध्ये 8 MP प्रायमरी कॅमेरा 2 GB रॅम, 5 MP फ्रंट कॅमेरा, ऑक्टा कोर प्रोसेसरसह 64 GB स्टोरेज आणि 6.3 इंच स्क्रीन मिळत आहे. तर 4000 mAh बॅटरीही यामध्ये देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 6,999 रुपयांपर्यंत उपलब्ध असणार आहे.
इंफीनिक्स स्मार्ट 7
इंफीनिक्स स्मार्ट 7 HD या स्मार्टमध्ये अँड्राईड ओएस, 128 MP प्रायमरी कॅमेरा 4 GB रॅम, 5 MP फ्रंट कॅमेरा, ऑक्टा कोर प्रोसेसर, 64 GB स्टोरेजसह 6.6 इंच स्क्रीन याशिवाय 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 6,949 रुपयांमध्ये मिळू शकणार आहे.
मोटोरोला मोटो E13
मोटोरोला कंपनीचा मोटो E13 हा एक अँड्राईड स्मार्टफोन असून, 13 (Go एडीशन) आहे. यामध्ये 13 MP प्रायमरी कॅमेरा, 2GB रॅम, 5MP फ्रंट कॅमेरा ऑक्टा कोर प्रोसेसर, 64 GB स्टोरेजसह 6.5 इंच स्क्रीन आणि 5000 mAh बॅटरी यामध्ये देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 6,497 रुपयांपर्यंत मिळणार आहे.







