Beed News : बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या बहुचर्चित पोटनिवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या जागेवर मतदारांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे. त्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव करत सरपंचपदावर आपली मोहोर उमटवली. Beed News

माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनामुळे ही निवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात पार पडली. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख स्वतः निवडणुकीच्या रिंगणात असल्याने, त्यांच्याबद्दल असलेल्या सहानुभूतीमुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता. मात्र, मतदारांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने कौल देत या सर्व अंदाजांना छेद दिला आहे. Beed News
या पोटनिवडणुकीसाठी गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली होती. विक्रमी 84 टक्के मतदान झाल्यामुळे निकालाबाबत मोठी उत्कंठा निर्माण झाली होती. मतदानाची ही मोठी टक्केवारी सत्तापालटासाठी की सहानुभूतीसाठी, याबाबतच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. Beed News
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोगचे राजकारण ढवळून निघाले होते. या निकालाने गावातील राजकीय समीकरणे बदलली असल्याचे स्पष्ट होत आहे. स्वरूपानंद देशमुख यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला असून, आता गावातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याचे आव्हान नवनिर्वाचित सरपंचांसमोर असणार आहे. Beed News







