Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Beed News : बनावट स्वाक्षऱ्यांचा घोटाळा उघड! तहसीलदार आशा वाघ यांच्यावर केज पोलिसात गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 11 December 2025, 11:57
beed news

photo- socila media

Beed News : बीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून काम करत असताना बनावट स्वाक्षऱ्या करून खोटे आदेश काढल्याप्रकरणी आशा दयाराम वाघ यांच्यावर अखेर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्या छत्रपती संभाजीनगर येथे संजय गांधी योजना विभागात तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. (Beed News)

या प्रकरणाबाबत तहसीलदार राकेश गिड्डे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आशा वाघ यांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून, तसेच गिड्डे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून शेतकऱ्यांना आणि सरकारला फसवले.

मंगळवारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गिड्डे यांना हे प्रकरण गंभीर असल्याने थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आणि लगेचच आशा वाघ यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. याआधीच महसूल विभागातील २४१ कोटींच्या बनावट लवाद आदेशांच्या प्रकरणाची चर्चा सुरू असताना हा आणखी एक प्रकार समोर आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, फेब्रुवारी ते जूनदरम्यान दहिफळ वडमाउली, लाडेगाव, नांदूरघाट आणि वाघेबाभूळगाव या गावांतील जमीन प्रकरणांमध्ये वाघ यांनी खोटे अर्धन्यायिक आदेश काढले. हे आदेश ‘तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या न्यायालयात’ अशा लेटरहेडवर तयार करण्यात आले होते, आणि त्यावरील स्वाक्षऱ्याही खोट्या असल्याचे सांगितले गेले. या प्रकरणाचे पुरावे गिड्डे तसेच महसूल विभागातील इतर अधिकारी ए. एन. भंडारे, जी. पी. नन्नवरे आणि एम. के. कोकरे यांनीही दिले.

याशिवाय आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक कामे आणि गैरहजेरीसंबंधी त्यांनी दुर्लक्ष केल्याचे ठपके ठेवत त्यांच्यावर विभागीय चौकशीही सुरु आहे. गावातील महसूल अधिकाऱ्यांना त्यांनी व्हॉट्सअॅपवरून हे आदेश नोंदवण्याचे निर्देश दिल्याचाही उल्लेख फिर्यादीत आहे. सर्व संबंधित कागदपत्रे त्यांनी स्वतःकडेच ठेवली असल्याचेही नमूद आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणेच गुन्हा नोंदवला असल्याचे तहसीलदार गिड्डे यांनी सांगितले. केज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमोल उनवणे यांनीही तक्रार आणि कागदपत्रे पाहून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दुष्काळाचा मोठा फटका! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यातील अनेक सहकारी संस्थाच्या निवडणुका स्थगित; हवेली तालुका खरेदी विक्री संघाची मात्र निवडणुक होणार

Wednesday, 28 October 2026, 11:15

जुन्नर तालुक्यातील घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद! चार घरफोड्यांची उकल; 38.50 लाखांचा मुद्देमाल जप्त..

Wednesday, 28 October 2026, 11:10

वाडेबोल्हाई मंदिरात ज्येष्ठ महिलेची दीड तोळ्याची पोत लंपास ; सलग दुसऱ्या रविवारी चोरीची घटना

Wednesday, 28 October 2026, 10:46

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंना मतपेटीत मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात मिळाली अवघी 19 मतं

Wednesday, 28 October 2026, 10:24

“पूजा झाल्याशिवाय जवळ येऊ नका!” नवरीचा बहाणा अन् संधी मिळताच सोनं, रोकड घेऊन पसार झाली लुटेरी दुल्हन

Wednesday, 28 October 2026, 10:14

नऱ्हेतील 21 वर्षीय तरुणावर पोलिसांची मोठी कारवाई; पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार

Wednesday, 28 October 2026, 10:00
Next Post
PI Sandeep Bhosale Passes Away

PI Sandeep Bhosale Passes Away : कर्करोगाशी लढा हरला; वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp