Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोंदू खरातला जामीन की तुरुंगवास ? जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, आता नजर पुढच्या तारखेकडे!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 31 August 2026, 16:04

नाशिक : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात भोंदूबाबा अशोक खरात याच्या जामीन अर्जावर आज होणारी सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यासाठी आजची वेळ निश्चित करण्यात आली होती. परंतु ही प्रक्रिया लांबल्यामुळे आता न्यायालय या प्रकरणी पुढील नवीन तारीख लवकरच घोषित केलीआहे.विविध पीडित महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आणि त्यांच्यावर दहशत निर्माण केल्याचा गंभीर आरोप असलेल्या अशोक खरात याच्या जामीन अर्जावर आता १६ सप्टेंबर रोजी न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

सध्या सत्र न्यायालयात (Session Court) अशोक खरातवर एकूण ६ वेगवेगळे खटले सुरू आहेत. यापैकी एका प्रकरणात त्याने जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. आपल्यावर लावण्यात आलेला गुन्हा हा जामीनपात्र स्वरूपाचा आहे, असा दावा खरातच्या बाजूने न्यायालयात करण्यात आला आहे.

सरकारी पक्षाचा जामिनाला तीव्र विरोध

दरम्यान, सरकारी पक्षाने खरातच्या या अर्जाला कडाडून विरोध केला आहे. न्यायालयात सादर केलेल्या लेखी खुलाशात सरकारी वकिलांनी नमूद केले की, आरोपीने अनेक महिलांवर गंभीर लैंगिक अत्याचार केले असून त्याच्यामुळे समाजात आणि पीडितांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भातील सर्व आवश्यक पुरावे आणि ठोस माहिती सरकारी पक्षाने न्यायालयासमोर मांडली असून, अशा गंभीर पार्श्वभूमीवर आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन मंजूर करू नये, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

 

वकिलांच्या अनुपस्थितीमुळे सुनावणी लांबणीवर

आज या जामीन अर्जावर न्यायालयात अंतिम युक्तिवाद होणार होता. मात्र, अशोक खरात यांचे वकील काही न्यायालयीन कामानिमित्त शहराबाहेर गेल्यामुळे ते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे खरात यांच्या बाजूने युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही. दुसरीकडे, सरकारी वकील न्यायालयात उपस्थित होते आणि त्यांनी जामिनाला विरोध करणारे कारणे व पुरावे कोर्टापुढे ठेवले.

आरोपीच्या वकिलांची गैरहजेरी लक्षात घेऊन न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ सप्टेंबरपर्यंत स्थगित केली आहे. आता या दिवशी दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय खरातच्या जामिनाबाबत आपला अंतिम निर्णय देईल.

भोदूं अशोक खरातवर नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून एकूण 17 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार करणे आणि त्यांची मोठी आर्थिक फसवणूक करणे यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. या खटल्याचे गांभीर्य लक्षात घेता, यातील 12 प्रकरणांचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला आहे.

आज कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाचा काय निर्णय येतो, याकडे पीडित महिलांसह सर्व नाशिककरांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, आता पुढील तारखेलाच यावर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केडगाव रेल्वे स्टेशन परिसरातील मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद! आरोपीकडून ७ मोटारसायकल जप्त; यवत पोलीसांची कामगिरी

Monday, 31 August 2026, 16:56

महिलांवर लैंगिक अत्याचार अन् भीतीचा बागलबुवा; १७ गुन्हे दाखल असलेल्या भोंदूबाबाच्या अडचणी वाढल्या!

Monday, 31 August 2026, 16:52

९१ विद्यार्थ्यांसह रस्त्यावरच भरवावा लागला वर्ग; चांडोहच्या जिल्हा परिषद शाळेला अज्ञात व्यक्तीचे कुलूप!

Monday, 31 August 2026, 16:38

CJPच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; केंद्र-दिल्ली पोलिसांना नोटीस, मोर्च्यावर मात्र बंदी नाही

Monday, 31 August 2026, 16:26

भोंदू खरातला जामीन की तुरुंगवास ? जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, आता नजर पुढच्या तारखेकडे!

Monday, 31 August 2026, 16:04

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उद्या पुण्यात मूक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार कर्मचारी

Monday, 31 August 2026, 15:55
Next Post

CJPच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; केंद्र-दिल्ली पोलिसांना नोटीस, मोर्च्यावर मात्र बंदी नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp