Amol Khatal Audio Clip Viral : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे वातावरण तापलंय. अशातच शिवसेनेचे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये ते संगमनेरमधील एका व्यापाऱ्याला शिवीगाळ आणि धमक्या देताना ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. क्लिप समोर आल्यानंतर लोकांनी खताळ यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. Amol Khatal Audio Clip Viral

Pune Prime News या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही, पण क्लिपमध्ये काय ऐकू येतं संवाद हा असा-
ऑडिओमध्ये काय ऐकू येतं?
खताळ यांचा पीए फोन व्यापाऱ्याला देताना सांगतो -“आमदारसाहेबांसोबत बोला ना…”
यानंतर अमोल खताळ आणि व्यापाऱ्यात पुढील संवाद:
खताळ: “काय अडचण आहे यांच्या गाडीची?”
व्यापारी: “कोण बोलतंय?”
खताळ: “अमोल खताळ बोलतोय”
व्यापारी पुन्हा विचारताच खताळ संतापतात- “तू लई शहाणा दिसतोय रे… हरामखोर! तुझा मालक कोण? त्याला फोन करायला सांग. नाही तर उद्या बंद करून टाकीन तुझं शोअरूम… एवढा माजलाय का तू?”
व्यापारी शांतपणे म्हणतो की “अमोल भाऊ, विषय सर्व्हिसिंगचा आहे…”
त्यावर खताळ पुन्हा संतापून- “गाडीचं काय ते पाहतो. मालकाचा नंबर पाठव 10 मिनिटात फोन आला पाहिजे. किती माजलाय तू… बघतो मी शोअरूम कसं चालतं ते!”
या व्हायरल क्लिपवर अमोल खताळ यांचे स्पष्टीकरण
ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर अमोल खताळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले-
तो ऑडिओ जुना आहे.त्यात जबरदस्त एडिटिंग करण्यात आलं आहे. तो काळ असा होता की त्या कंपनीकडून गाडीचे पार्ट बदलून ग्राहकांची फसवणूक होत होती. त्यामुळे आधीही आम्ही एक दोन वेळेस त्यांना जाब विचारला होता की तुम्ही ग्राहकांची फसवणूक का करताय. कोणी चुकीचं काम करत असेल तर शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याची धमक शिवसेनेचा आमदार आणि कार्यकर्ता म्हणून आहे. असंही मी त्यांना बोललो माझ्या भावना त्यावेळेस तीव्र होत्या, आताही त्यांच्याकडून यात आणि सुधारणा नाही झाली तर पुढेही राहतील,” असं खताळ म्हणाले
या ऑडिओ क्लिपमुळे संगमनेरमध्ये आणि राजकीय वर्तुळात चांगलंच खळबळ माजली आहे. निवडणूक तोंडावर असताना ही क्लिप व्हायरल झाल्याने चर्चा आणखी तापण्याची शक्यता आहे.







