Delhi Blast: सोमवारी सांयकाळी दिल्लीत एक भयान स्फोट (Delhi Blast) झाला. या घटनेत 8 जणांनी आपले प्राण गमावले असून 11 जणांहून अधिक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेसंदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah Statement) यांनी देशाला संबोधित केले आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोट झाल्यानंतर पहिल्यांदा गृहमंत्री अमित शहा माध्यांमासमोर आले आहे. मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर अमित शाह यांनी देशावाशींना संबोधित केले. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी हाय अर्लट जारी केला आहे.
गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिक्रिया
लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ स्फोट झाला तो भीषण होता. “आज संध्याकाळी 7 वाजता दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर एका हुंडई i 20 वाहनाचा स्फोट झाला. या स्फोटात काही पादचाऱ्यांना दुखापत झाली आणि काही वाहनांचे नुकसान झाले. सुरुवातीच्या अहवालात असे दिसून आले आहे की, काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर 10 मिनिटांतच दिल्ली गुन्हे शाखा आणि दिल्ली विशेष शाखेच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचले. एनएसजी आणि एनआयए पथकांनी एफएसएलसह आता सखोल तपास सुरू केला आहे.
#WATCH | दिल्ली: लाल किला मेट्रो स्टेशन के पास विस्फोट | केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने कहा, “आज शाम लगभग 7 बजे, दिल्ली में लाल किले के पास सुभाष मार्ग ट्रैफ़िक सिग्नल पर एक हुंडई i20 गाड़ी में विस्फोट हुआ। इस विस्फोट में कुछ पैदल यात्री घायल हो गए और कुछ वाहन क्षतिग्रस्त हो गए।… pic.twitter.com/4BPaJQiwiu
— ANI_HindiNews (@AHindinews) November 10, 2025
हेही वाचा- Delhi Blast: दिल्ली स्फोटाच्या पूर्वीचा CCTV Video व्हायरल; धक्कादायक माहिती समोर…
परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मी दिल्ली पोलिस आयुक्त आणि विशेष शाखेच्या प्रभारी यांच्याशीही बोललो आहे. दिल्ली पोलिस आयुक्त आणि विशेष शाखेचे प्रभारी घटनास्थळी उपस्थित आहेत. आम्ही सर्व शक्यतांचा विचार करत आहोत आणि सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. सर्व पर्यायांची त्वरित चौकशी केली जाईल आणि आम्ही निकाल जनतेसमोर सादर करू. मी लवकरच घटनास्थळी भेट देईन आणि तातडीने रुग्णालयात जाईन.”







