Delhi Blast CCTV: देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्लाजवळ सोमवारी सांयकाळी भीषण (Delhi Blast) स्फोट झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे देशभरातून हा दहशतवादी हल्ला (Terrorist Attacks) असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला तर 24 हून अधिक लोक जखमी झाले. ज्या कारमध्ये स्फोट झाला. त्या कारचे स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज समोर आले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या कारमध्ये हा स्फोट झाला ती i 20 कार लाल किल्ल्याजवळील गर्दीतून जात असताना दिसत आहे. कारमध्ये ड्राव्हव्हरच्या सीटवर बसलेला व्यक्ती हा दहशतवादी मोहम्मद अमर असल्याची माहिती समोर येत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याने काळा मास्क घातलेला दिसत आहे.
हेही वाचा– Breaking News: दिल्ली स्फोट प्रकरणी दोघेजण ताब्यात! कारचं कनेक्शन समोर…
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
या घटनेनंतर तपास यंत्रणांनी आतापर्यंत 50 हून जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले आहे. ही कार मुख्य मार्गांवरून फिरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली. त्यानंतर शेवटी लाल किल्ल्याच्या परिसरात पार्किंग भागात दिसली. या स्फोटामागचा नेमका हेतू आणि या कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेतला जात आहे.







