Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील येरवडा जमीन विक्रीचा दबाव, अजित पवारांवरील आरोपांवर मीरा बोरवणकर थेट म्हणाल्या…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 16 October 2023, 18:00
Ajit Pawar in tight spot over former police chiefs allegations in memoir

नवी दिल्ली: पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकातील एका प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकात एकूण 38 प्रकरणे आहेत. येरवड्यातील जमिनीबाबत पुस्तकात फक्त एकच प्रकरण आहे. त्यामुळे एकाच प्रकरणापुरते या पुस्तकाला संकुचित करू नका, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

मीरा बोरवणकर यांनी सोमवारी सायंकाळी दिल्लीत पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सुरू असलेल्या आरोपांबाबत त्यांनी भाष्य केले. बोरवणकर यांनी म्हटले की, पुस्तकात 38 प्रकरणे आहेत. पुस्तकात एकतर्फी प्रेमात तरुणीची झालेली हत्या, मानवी तस्करी, जळगाव सेक्स स्कँडल अशी अनेक प्रकरणे आहेत. एकाच प्रकरणाबद्दल मला सारखी विचारणा करू नका. हे पुस्तक मुली-महिलांचे शोषण, प्रशासन, उत्कृष्ट तपास अशा विविध मुद्यांवर आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आरोपांबाबत काय म्हणाल्या?

 

माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्या प्रकरणाबाबत म्हटले की, पुणे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या जमिनीच्या लिलावासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली होती. त्या समितीने आपली प्रक्रिया पूर्ण केली. पुणे पोलिसांचा कार्यभार माझ्याकडे असल्याने जमिनीवरील ताबा सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली होती. अजित पवार यांनीदेखील हाच आग्रह धरला होता. लिलाव झाल्याने आता हस्तांतरण प्रक्रिया सुरू करा असे पवार म्हटले. मात्र, माझ्या दृष्टीने ती जागा खूप महत्त्वाची होती. पुढे जाऊन पुणे पोलीस आयुक्तालय, पोलिसांच्या गृहनिर्माणासाठी ही जागा वापरता आली असती. त्यामुळेच मी त्या तीन एकर जमिनीच्या लिलावाला आक्षेप घेत हस्तांतरणाला विरोध केला असल्याचे मीरा बोरवणकर यांनी सांगितले.

पुढे बोलताना मीरा बोरवणकर यांनी म्हटले की, येरवड्याची जागा ही शाहीद बलवा या बिल्डरला देण्यात येणार होती. या लिलावात त्यांनी बाजी मारली. मात्र, टूजी घोटाळ्यात पुढे सीबीआयने त्यांना अटक केल्याने सरकारची संभाव्य होणारी अवहेलना टळली.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यात दोन मित्रांची एकच गर्लफ्रेंड! भांडणातून झालेला अपमान जिव्हारी लागला अन् दारू पिऊन मित्रानेच घात केला…

Friday, 19 June 2026, 15:42

पुण्यात विवाहितेचा भयानक शेवट! किरकोळ वादातून सुखी संसाराची राखरांगोळी; रागाच्या भरात ओढणीने बायकोचा गळा दाबला अन्…

Friday, 19 June 2026, 15:03

मैत्री, प्रेम अन् शेवटी धोका! लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर अत्यचार; फॅशन डिझायनर जय मारुविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:53

दौंडमध्ये मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोन जणांना अटक, गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:42

पुण्यात स्कूल बसचा थरार! एकाच शाळेच्या दोन बसची धडक; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Friday, 19 June 2026, 14:30

भोरमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या उपस्थितीत ‘विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम 2026’चे प्रशिक्षण संपन्न

Friday, 19 June 2026, 14:23
Next Post

Amalner News : साने गुरुजी, बहिणाबाईंच्या मातीतील साहित्य संमेलन दिशादर्शक ठरणार : डॉ. रविंद्र शोभणे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.