Wednesday, November 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टायगर श्रॉफनंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेता बिश्नोई गँगच्या निशाण्यावर! 5 कोटींची मागणी, न दिल्यास जीवे मारण्याची धमकी?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 November 2026, 11:57

पुणे : बॉलीवूड अभिनेते टायगर श्रॉफच्या प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, आता अभिनेता तुषार कपूरला जीवे मारण्याची आणि खंडणीची धमकी मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीतील हॅरी बॉक्सर नावाच्या व्यक्तीच्या नावाने हा फोन आला असून, अभिनेत्याकडे 5 कोटी रुपयांची मोठी रक्कम मागितली गेली. या प्रकारामुळे हिंदी चित्रपट वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, धमकीचा फोन येताच अभिनेत्याने त्वरित मुंबई पोलिसांशी संपर्क साधून सर्व माहिती दिली. त्यानंतर गुन्हे शाखेने तातडीने या ऑडिओ कॉलची पडताळणी सुरू केली. तपासादरम्यान पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा आवाज आणि हॅरी बॉक्सरचे उपलब्ध आवाज नमुने (ऑडिओ सँपल) यांची आपसात तुलना केली. प्राथमिक तांत्रिक विश्लेषणात दोन्ही आवाज पूर्णपणे वेगवेगळे असल्याचे व एकमेकांशी अजिबात जुळत नसल्याचे निष्पन्न झाले.

यामुळे हा धमकीचा फोन पूर्णपणे बनावट व दिशाभूल करणारा असल्याचा दाट संशय मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने व्यक्त केला आहे. कोणा अज्ञाताने केवळ दहशत निर्माण करण्यासाठी आणि भीती दाखवून बेकायदेशीरपणे पैसे उकळण्याच्या हेतूने कुख्यात गुंडाचे नाव वापरल्याचा अंदाज अधिकारी वर्तवत आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, हा कॉल नेमका कुठून आणि कोणी केला याचा माग काढला जात आहे. अद्याप याप्रकरणी कोणतीही औपचारिक नोंद (एफआयआर) झालेली नाही.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबाराची मोठी घटना घडली होती. त्या प्रकरणानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आमिर खान आणि रणवीर सिंह यांच्यासह अनेक बड्या कलाकारांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अन् वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या; १२ गुन्हे उघडकीस!

Wednesday, 4 November 2026, 17:14

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! दीड महिन्यानंतर रायगड रोपवे सेवा आजपासून पुन्हा सुरू

Wednesday, 4 November 2026, 17:05

रुग्णसेवा करताना महिला कर्मचाऱ्याला पतीची मारहाण; दौंडजच्या आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार

Wednesday, 4 November 2026, 17:03

Purandar News : शेतातील खड्ड्यावरून वाद पेटला; महिला व दोन भावांना काठीने मारहाण!

Wednesday, 4 November 2026, 17:03

Daund News : व्हिडीओ कॉलवरून पत्नीचा जाब विचारताच पतीचा संताप; लाकडी दांडक्याने मारहाण

Wednesday, 4 November 2026, 16:37

उरुळी कांचनमध्ये दुचाकी दुभाजकाला धडकली; 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

Wednesday, 4 November 2026, 16:22
Next Post

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निकालांचा धुरळा! फलटणमध्ये रामराजेंचा दबदबा, पाटणमध्ये शंभूराज देसाईंचा विजय; गोरेंनीही मारली बाजी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp