Wednesday, November 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Purandar News : शेतातील खड्ड्यावरून वाद पेटला; महिला व दोन भावांना काठीने मारहाण!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 4 November 2026, 17:03

पुरंदर, ता. 4 : शेतात खोदलेला मोठा खड्डा बुजविण्यावरून दोन कुटुंबांत जोरदार वाद होऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. यामध्ये एका महिलेसह दोघा भावांना काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना नाझरे कप (ता. पुरंदर) येथे घडली. याप्रकरणी राजश्री संजीव रांधवण आणि तिचा मुलगा प्रकाश संजीव रांधवण यांच्याविरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत गणपत नामदेव रांधवण (वय 54, रा. नवीन वसाहत, कात्रज, पुणे; मूळ रा. नाझरे कप) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत रांधवण यांचे नाझरे कप येथे शेती असून, त्यांच्या शेतात संजीव दत्तात्रय रांधवण यांनी मोठा खड्डा केल्याची माहिती त्यांचे भाऊ संपत यांनी फोनवरून दिली. त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी गणपत हे भाऊ नवनाथ, संपत, त्यांच्या पत्नी आणि पुतण्यासह शेतात गेले. यावेळी खड्ड्याबाबत विचारणा केली असता संजीव यांची पत्नी राजश्री हिने संबंधित शेतजमीन आपली असल्याचे सांगत त्यांना जाब विचारण्यास विरोध केला.

दरम्यान, संबंधित जमीन यापूर्वीच खरेदी केली असून न्यायालयाचा आदेशही आपल्या बाजूने असल्याचे सांगत कुटुंबीयांनी जेसीबीच्या साह्याने खड्डा बुजविण्यास सुरुवात केली. यावरून राजश्री आणि तिचा मुलगा प्रकाश यांनी शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. वाद वाढल्याने पोलिसांना 112 क्रमांकावर फोन करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्ही बाजूंना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले.

मात्र, पोलिस निघून गेल्यानंतर पुन्हा वादाला सुरुवात झाली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या निर्मला संपत रांधवण यांचे केस धरून त्यांना खाली पाडण्यात आले. त्यानंतर काठीने दोन्ही खांद्यांवर मारहाण करण्यात आली. तसेच प्रकाश याने गणपत यांच्या उजव्या हाताच्या दंडावर काठीने मारहाण केली, तर संपत यांनाही हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

यावेळी पुन्हा शेतात आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. जखमींना जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर गणपत यांना पुढील तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी जेजुरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! दीड महिन्यानंतर रायगड रोपवे सेवा आजपासून पुन्हा सुरू

Wednesday, 4 November 2026, 17:05

रुग्णसेवा करताना महिला कर्मचाऱ्याला पतीची मारहाण; दौंडजच्या आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार

Wednesday, 4 November 2026, 17:03

Purandar News : शेतातील खड्ड्यावरून वाद पेटला; महिला व दोन भावांना काठीने मारहाण!

Wednesday, 4 November 2026, 17:03

Daund News : व्हिडीओ कॉलवरून पत्नीचा जाब विचारताच पतीचा संताप; लाकडी दांडक्याने मारहाण

Wednesday, 4 November 2026, 16:37

उरुळी कांचनमध्ये दुचाकी दुभाजकाला धडकली; 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

Wednesday, 4 November 2026, 16:22

जमिनीच्या वादातून कोंढणपुरमध्ये दगडफेक; शेतकरी आणि भाच्याला मारहाण!

Wednesday, 4 November 2026, 16:20
Next Post

रुग्णसेवा करताना महिला कर्मचाऱ्याला पतीची मारहाण; दौंडजच्या आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp