पुणे : दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलकांचे नेतृत्व करणारे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांची प्रकृती खालावली असून, त्यांना टायफॉइड झाल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय उपचारादरम्यानचा आणि सलाईन लावलेला एक फोटो त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अभिजीत दिपके यांच्या तब्येतीची माहिती समोर आल्यानंतर देशभरातील विद्यार्थी, युवा वर्ग आणि समर्थक त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
ऐन आंदोलनाच्या काळात सततच्या धावपळीमुळे व तीव्र तापाने फणफणल्यामुळे अभिजीत यांना टायफॉइड झाल्याचे निदान झाले आहे.डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात निर्माण झालेल्या प्रचंड असंतोषामुळे आणि ‘जेन-झी’ पिढीच्या वाढत्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागला. या राजकीय घडामोडींनंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि सर्वत्र जल्लोष सुरु झाला. या राजीनाम्यानंतर अभिजित दिपके यांनी जेंनझींना सांगितले कि, तुम्ही जर नसता तर हा विजय झालाच नसता. सर्व तुमच्यामुळे घडले असे त्याने म्हटले

दरम्यान आंदोलनात अभिजित दिपकेचीं तब्येत खालवली होती.तरीही केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन थांबवणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. आरोग्याची साथ नसतानाही विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेला हा लढा अजिबात मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी केला आणि अखेर त्यांच्या लढ्याला यश आले.आता अभिजित दिपके यांच्या चांगल्या आरोग्यासाठी विद्यार्थी प्रार्थना करत आहेत.







