बुलढाणा : गेल्या काही दिवसापासून राज्यात अपघातांच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच आता बुलढाण्यात विटांनी भरलेला ट्रकची आणि मोटरसायकलची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अजय संजय कावणे(वय 29) असं मृत तरुणाचं नाव आहे. मामा सुरेश मुरलीधर लोखंडे यांच्यासोबत सावणे हा दुचाकीवरून मलकापूरकडे जात असताना विटांनी भरलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत युवकाच्या मेंदूचा चेंदामेंदा झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचे मामा गंभीर जखमी झाले आहेत.ही दुर्दैवी घटना मोताळा मलकापूर रस्त्यावरील तालखेड फाट्याजवळ घडली आहे. दरम्यान मृत तरुणाचं नुकताच लग्न ठरलं होतं अशी माहिती देखील त्यांच्या नातेवाईकांनी दिले आहे. अपघात घडल्यानंतर घटनास्थळावर नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.
बोरखडी पोलीस स्टेशनचे एपीआय शिंगेपल्ली, एस आय शरद खर्चे, एनपीएल प्रवीण पडोळ यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला असून संबंधित ट्रक पोलीस स्टेशनला आणला आहे. तसेच ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








