Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निवासी डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यासह देशभरातील निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन; अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 13 August 2024, 9:08

मुंबई : कोलकात्यात घडलेल्या घटनेनं संपूर्ण देशाळा हादरा बसला आहे. सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरची बलात्कार करुन हत्या केल्याची संतापजनक घटना कोलकात्यात घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर आज, मंगळवारपासून कोणतेही नियमित काम करणार नसल्याचं महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) संघटनेनं निवेदनाद्वारे कळवलं आहे. तसेच, या काळात अत्यावश्यक सेवा सुरूच असतील असं सुद्धा मार्डच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

 

सेवा बंदचे आवाहन..

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन नं मंगळवार, 13 ऑगस्टपासून देशव्यापी निषेध दर्शवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ओपीडी आणि वैकल्पिक सेवा बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे. 9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेने पूर्ण देश हादरला होता. या घटनेचा निषेध म्हणून आज देशभरातील डॉक्टरांनी बंद पुकारला आहे.

अनिश्चित कालावधीसाठी आंदोलन..

फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील निवासी डॉक्टरांच्या संघटनेनेसुद्धा सर्व निवासी डॉक्टरांना निवडक सेवा बंद करण्याचे आवाहन केलं होतं. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील निवासी डॉक्टर संघटनेनं आणि राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांनी त्यांचा निर्णय जाहीर केला. हे काम बंद आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत असून अनिश्चित कालावधीसाठी असल्याचं सांगण्यात येत आहे. वैद्यकीय वर्तुळात कोलकाता येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे.

निवासी डॉक्टरांच्या मागण्या..

  1. संपकरी निवासी डॉक्टरांचा पोलिसांनी जाच करू नये.
  2. तज्ज्ञांची समिती स्थापन करून केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी.
  3. केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत कोलकाता निवासी डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
  4. वसतिगृहाची व्यवस्था करून ड्युटीवरील डॉक्टरांसाठी चांगल्या अद्ययावत खोलीची व्यवस्था करावी.
  5. रुग्णालय परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवावी, पुरेशा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी.

We Stand with Protesting Doctors all Over India !
We calls Doctor all over nation to Join this Protest from Tomorrow onwards !

We want Justice!#Nirbhaya2.0
Twitter Storm – 11 AM -13/08/2024,,#MedTwitter@ANI @AmitShah @JPNadda @MamataOfficial @WBPolice @PTI_News @aajtak pic.twitter.com/XUPP4vQrnI

— FAIMA Doctors Association (@FAIMA_INDIA_) August 12, 2024


FAIMA च्या वतीनं ट्विटरवर ट्वीट करण्यात आलं आहे की, “आम्ही भारतभर आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांच्या पाठीशी उभे आहोत! आम्ही देशभरातील डॉक्टरांना आजपासून या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करतो! आम्हाला न्याय हवा आहे!”

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशननं केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांना पत्र लिहून महिला डॉक्टरसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत तातडीनं कारवाई करण्याची विनंती केली आहे. दोषींना न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी आयएमएनं केली आहे. तसेच, असा गुन्हा कोणत्या परिस्थितीत घडला, याची सखोल चौकशी करण्याची मागणी असोसिएशननं केली आहे. त्याचप्रमाणे, कामाच्या ठिकाणी डॉक्टरांची, विशेषत: महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी पावलं उचलावीत, अशी मागणीही IMA च्या वतीनं करण्यात आली आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post

 केमोथेरपी : एक प्रभावी कर्करोग उपचार पद्धती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.