Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिजीत दिपकेंना दणका! शिवाजी पार्क आंदोलन प्रकरणात पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, थेट…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 October 2026, 11:10

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर विनापरवानगी आंदोलन केल्यामुळे कॉक्रोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. नियमांचे उल्लंघन करून हा कार्यक्रम आयोजित केल्याने दिपके यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

कॉक्रोच जनता पक्षाच्या या आंदोलनाला मुंबई पोलिसांची कोणतीही अधिकृत मंजुरी मिळाली नव्हती. तसेच तेथील स्थानिक रहिवाशांनीदेखील या सभेला तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र, सर्व विरोधांना बाजूला सारत कॉक्रोच जनता पक्षाचे कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. स्थानिकांच्या विरोधामागे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी यावेळी केला. या आंदोलनासाठी देशाच्या विविध भागांतून तरुण आणि काही प्रसिद्ध सेलिब्रिटी शिवाजी पार्कात एकत्र आले होते. कार्यक्रमादरम्यान झालेल्या मोठ्या सभेत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली.

दुसरीकडे, ॲडव्होकेट सिद्धी देवळेकर यांनी या बेकायदेशीर आंदोलनाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, परवानगी नसताना घेतलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरातील शांततेला बाधा पोहोचली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. वकिलांनी उच्च न्यायालयाच्या 2013 मधील एका महत्त्वाच्या निर्णयाचा हवाला दिला, ज्यानुसार शिवाजी पार्क परिसरात अशा प्रकारच्या आंदोलनांवर बंदी आहे.

आता मुंबई पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत अभिजीत दिपके यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू केली आहे.त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरलं! कात्रज-कोंढवा रोडवर तरुणाचा खून; दारुपार्टीत वाद अन् मित्रानेच काढला काटा

Sunday, 4 October 2026, 19:33

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09

सियाचे २ बॉयफ्रेंड, हबी-वायफीचे मेसेज अन् ‘तुझं तोंड बंद ठेव नाहीतर’ मैत्रिणीला दिलेली धमकी; सिया गोयलचे नवे कारनामे समोर…

Sunday, 4 October 2026, 16:48

“मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये” माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Sunday, 4 October 2026, 16:34

‘दादांचं नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवा’ सुनेत्राताईंचं आव्हान; “मी अजित पवारांचे नाव वापरणारच” नेत्याचं प्रतिउत्तर

Sunday, 4 October 2026, 16:17
Next Post

बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीड कारागृहात मोठी कारवाई! तब्बल 7 तास झडती, कैद्यांची कसून चौकशी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp