Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

साडेसतरानळी मनपा शाळेतील 400 हून अधिक विद्यार्थ्यांचा जीवघेणा धोका टळला; क्रांती शेतकरी संघाच्या तत्परतेने आग्या मधमाश्यांचे पोळे हटवले!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 17 October 2026, 17:45

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातील साडेसतरानळी येथील महानगरपालिकेच्या शाळेतील 400 हून अधिक विद्यार्थ्यांवर आलेले मोठे संकट अखेर टळले आहे. शाळेच्या आवारात असलेल्या मधमाश्यांच्या मोठ्या पोळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, क्रांती शेतकरी संघाच्या तत्परतेमुळे आणि प्रशासनाच्या वेगावान हालचालींमुळे हे पोळे सुरक्षितपणे हटवण्यात आले आहे.

या शाळेमध्ये पहिली ते सातवी वर्गात शेकडो गरीब कुटुंबातील लहान मुले शिक्षण घेतात. शाळेच्या परिसरात मधमाश्यांचे पोळे असल्याने सतत मधमाश्या घोंघावत होत्या. यामुळे पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन क्रांती शेतकरी संघाचे अमोल नाना तुपे यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी या समस्येबाबत हडपसर प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रशांत मामा तुपे आणि हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त कुणाल धुमाळ यांच्याकडे लिखित निवेदन सादर केले.

निवेदन मिळताच प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तत्परता दाखवली. प्रभाग समिती अध्यक्ष प्रशांत मामा तुपे, सहाय्यक आयुक्त कुणाल धुमाळ आणि नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी स्वतः शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्यांनी संबंधित यंत्रणेला जागेवरच मधमाश्यांचे पोळे त्वरित हटवण्याचे कडक निर्देश दिले.

स्थानिक प्रशासनाच्या आदेशानंतर लगेचच पावले उचलत हे धोकादायक पोळे सुरक्षितपणे काढून टाकण्यात आले. या घटनेमुळे मोठा अनर्थ टळला असून शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने पाठपुरावा करून मदत केल्याबद्दल पालकवर्गाकडून अमोल नाना तुपे आणि स्थानिक प्रशासनाचे विशेष आभार मानले जात आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोहगडच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची एंट्री; तपासानंतर आता खटल्याकडे लक्ष….

Saturday, 17 October 2026, 18:45

प्रदीप पूर्णेकरांनंतर आता पुतणी खुशबूला धमकी! ‘पुढचं टार्गेट तूच’; प्रताप सरनाईकांसमोर खळबळजनक दावा

Saturday, 17 October 2026, 18:07

शेअर बाजारात जादा परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर टोळीवर मकोका ; 9 आरोपींवर कारवाई

Saturday, 17 October 2026, 17:53

साडेसतरानळी मनपा शाळेतील 400 हून अधिक विद्यार्थ्यांचा जीवघेणा धोका टळला; क्रांती शेतकरी संघाच्या तत्परतेने आग्या मधमाश्यांचे पोळे हटवले!

Saturday, 17 October 2026, 17:45

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ड्रामा! आमदार सुनील शेळकेंवर RTI कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Saturday, 17 October 2026, 17:01

टीम इंडियात मोठे उलटफेर! जडेजा-शमी OUT, पंतलाही डच्चू; न्यूझीलंड दौऱ्यासाठी BCCI चे 5 धक्कादायक निर्णय..

Saturday, 17 October 2026, 16:36
Next Post

शेअर बाजारात जादा परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर टोळीवर मकोका ; 9 आरोपींवर कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp