Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बोरीऐंदीत बुलेट-हायवा टिप्परची जोरदार धडक ; उरुळी कांचन येथील दोघे मित्र जखमी, अपघातानंतर टिप्परचालक घटनास्थळावरून पसार

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 25 October 2026, 13:39

उरुळी कांचन : बोरीऐंदी गावाजवळ बुलेट दुचाकी आणि भरधाव हायवा टिप्परची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन मित्र जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 23) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. अपघातानंतर टिप्परचालक घटनास्थळी न थांबता पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज राजेश प्रसाद वय 21 वर्षे व्यवसाय शिक्षण रा. उरुळीकांचन, मुखाकी दर्शन सोसायटी, डाळींब रोड उरुळी कांचन ता. हवेली) व शिरीष किशोर लोणारी असे अपघातात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

सुरज प्रसाद हा उरुळी कांचन येथील अस्मिता कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. शुक्रवारी सकाळी तो मित्र किशोर लोणारी याच्यासोबत त्याच्या बुलेट दुचाकीवरून कामानिमित्त बोरीऐंदी येथे गेला होता. काम आटोपून दोघेही उरुळी कांचनकडे परतत असताना सुरज दुचाकी चालवत होता, तर शिरीष मागे बसला होता. बोरीऐंदी गावात दर्याजवळ आले असता, बोरीऐंदी फाट्याकडून ताम्हणवाडीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या हायवा टिप्परने त्यांच्या बुलेटला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर पडले. सुरजला मुका मार लागला, तर शिरीषच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावली. जखमी शिरीषला उपचारासाठी उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातास कारणीभूत ठरलेला हायवा टिप्पर क्रमांक MH 12 WJ 8554 वरील चालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक थिकोळे पुढील तपास करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

“तू चांगली का राहतेस?” म्हणत पतीचा संताप अनावर; लाकडी दांडक्याने पत्नीला बेदम मारहाण…

Sunday, 25 October 2026, 14:16

पुणेकरांनो बाल्कनीत कपडे वाळत घालणं महागात पडणार? महापालिका आणतेय नवा नियम; नेमकं कारण काय?

Sunday, 25 October 2026, 13:49

बोरीऐंदीत बुलेट-हायवा टिप्परची जोरदार धडक ; उरुळी कांचन येथील दोघे मित्र जखमी, अपघातानंतर टिप्परचालक घटनास्थळावरून पसार

Sunday, 25 October 2026, 13:39

पुण्यात रिसॉर्टवर देहविक्रीचा पर्दाफाश! अवघ्या ₹1000 मध्ये महिलांचा देहव्यापार; कारवाईने खळबळ

Sunday, 25 October 2026, 13:00

‘राणा’ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध संगीतकार-गायक जोडीलाही लावला करोडो रुपयांचा चुना? स्वत:वरील हल्ल्याचा सूत्रधारही राणाच असल्याची चर्चा; पोलीस अभय देणार की सहआरोपी करणार? राज्याचे लक्ष!

Sunday, 25 October 2026, 12:45

उरुळी कांचन येथे भरधाव स्विफ्टची ज्येष्ठ महिलेला धडक; उपचार खर्च देण्याचे आश्वासन देऊनही कारमालक न आल्याने तक्रार दाखल

Sunday, 25 October 2026, 12:29
Next Post

पुणेकरांनो बाल्कनीत कपडे वाळत घालणं महागात पडणार? महापालिका आणतेय नवा नियम; नेमकं कारण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp