पुणे : जागतिक बाजारातील घडामोडी आणि डॉलर मजबूत झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतीं सलग तिसऱ्या दिवशी घसरल्या आहेत.आज दोन्ही प्रकारच्या सोन्याच्या किमतीत 10 ग्रॅममागे 10 रुपयांची किरकोळ घसरण नोंदवली गेली. औद्योगिक क्षेत्राकडून मागणी घटल्याने चांदी देखील स्वस्त झाली असून, आज चांदीच्या भावात प्रति किलो 100 रुपयांची घसरण झाली आहे.

भारतात 8 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,525 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,314 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,893 रुपये आहे. तर चांदीचा भाव प्रति ग्रॅम 244.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,44,900 रुपये आहे

दिल्ली आणि इतर शहरांमध्ये गेल्या तीन दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम एकूण 1480 रुपयांची, तर 22 कॅरेट सोन्यात 1360 रुपयांची मोठी घट झाली आहे. आज दिल्लीमध्ये चांदीचा दर 2,44,800 रुपये प्रति किलोवर आला आहे. मुंबई आणि कोलकात्यात हा भाव प्रति किलो 2,44,900 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये देशातील सर्वाधिक म्हणजेच 2,49,900 रुपये प्रति किलो दराने चांदी विकली जात आहे.
अमेरिका आणि इराणमधील चर्चेची पुढील फेरी तसेच कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतार सोन्याच्या दरासाठी महत्त्वाचे ठरतील. सध्यातरी सोने-चांदी मर्यादित कक्षेत राहण्याची शक्यता असली, तरी पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव निवळल्यास किमतींना पुन्हा एकदा चांगला आधार मिळू शकतो.त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो.






