Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हाताला फ्रॅक्चर आणि उपचारादरम्यान मृत्यू ! दोन महिने झाले मग, पूजा गई यांना न्याय कधी?

योगेश मारणेby योगेश मारणे
Wednesday, 14 October 2026, 16:46

शिरूर : शिरूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा कारभार नेमका कोणाच्या हितासाठी चालतोय? सर्वसामान्य रुग्णांच्या जीवाची किंमत प्रशासनाच्या लेखी किती आहे? एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर चौकशी, आश्वासने आणि कागदी घोडे नाचवण्यापलीकडे प्रत्यक्षात काय घडते? असे अस्वस्थ करणारे प्रश्न दोन महिन्यांपूर्वी पूजा गई (वय27 ) या तरुण महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणामुळे ऐरणीवर आले आहेत.

केवळ हाताला फ्रॅक्चर झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या पूजा गई यांचा 8 ऑगस्ट रोजी शिरूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. विविध स्तरांतून संताप व्यक्त करण्यात आला आणि शिरूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. मात्र, घटनेनंतरही संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप होत असल्याने ‘रुग्णाचा जीव गेला, आता न्यायाची जबाबदारी कोणाची?’ हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

पूजा गई यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी, रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि खासगी रुग्णालयांच्या कामकाजावरील नियंत्रण याबाबत चर्चा झाली. मात्र, एखाद्या गंभीर घटनेनंतर केवळ चर्चा होणे पुरेसे आहे का? संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे, दोषी आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणे, ही प्रशासनाची जबाबदारी नाही का?असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

पूजा गई यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार केली असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही संबंधित रुग्णालय आणि डॉक्टरविरुद्ध अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात नेमकी कोणती चौकशी झाली, वैद्यकीय निष्काळजीपणाचा संशय तपासण्यासाठी कोणती पावले उचलली आणि कारवाईला विलंब होत असल्यास त्यामागचे कारण काय? याची स्पष्ट माहिती प्रशासनाने जनतेसमोर ठेवण्याची गरज आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असेल, तर न्यायव्यवस्थेवरील आणि प्रशासकीय यंत्रणेवरील विश्वास टिकणार कसा? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

 

याप्रकरणी अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित होत असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याप्रकरणी आपल्याकडे कोणतीही तक्रार आली नसल्याचे स्पष्ट सांगितले. तर, आरोग्य उपसंचालक भगवान पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

डॉक्टरांवरील हल्ल्याची दखल तत्परतेने; रुग्णाच्या मृत्यूच्या प्रकरणात विलंब का?

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये पोलिसांकडून तत्परतेने कारवाई केली जाते. डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निश्चितच गंभीर असून त्यांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. मात्र, रुग्णांच्या सुरक्षिततेलाही तितकेच महत्त्व दिले जाणे अपेक्षित आहे.

पूजा गई यांच्या प्रकरणात नेमकी कोणती कायदेशीर कार्यवाही करण्यात आली, याबाबत पोलिस प्रशासनाने स्पष्टता देणे आवश्यक आहे. वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप असल्यास त्याची तज्ज्ञांकडून तपासणी करून पुराव्यांच्या आधारे निर्णय घेणे गरजेचे आहे. डॉक्टर असो वा रुग्णालय, रुग्णाचा नातेवाईक असो वा सामान्य नागरिक—कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत.

ऑन-कॅमेरा शवविच्छेदन झाले; पुढील तपासाचे काय?

पूजा गई यांच्या मृत्यूनंतर ससून रुग्णालयात ऑन-कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती आहे. शवविच्छेदन ही मृत्यूचे कारण स्पष्ट करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाची बाब असली, तरी त्यानंतरच्या तपासाचेही तितकेच महत्त्व आहे.

मृत्यूचे नेमके कारण काय? उपचारादरम्यान वैद्यकीय नियमांचे पालन झाले होते का? उपचारपद्धतीत काही त्रुटी होत्या का? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे गरजेचे आहे. तसेच कायद्यानुसार कार्यवाही होणे अपेक्षित आहे. या प्रक्रियेत विलंब होत असल्यास त्याची कारणेही स्पष्ट केली पाहिजेत.

पूजा गई यांच्या प्रकरणातून आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन आणि संबंधित नियामक यंत्रणांनी धडा घेण्याची गरज आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार उपचार मिळणे हा त्यांचा मूलभूत अपेक्षित हक्क आहे. त्यासाठी प्रशासनाने खाजगी रुग्णालयांची नियमित तपासणी, तक्रारींचे वेळेत निराकरण आणि नियमभंग करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

म्हाडाच्या ४४६२ घरांच्या लॉटरीसाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठी संधी

Wednesday, 14 October 2026, 23:00

वरकुटे बुद्रुकमध्ये चोरट्यांचा डल्ला! घरातून १.३० लाखांची रोकड अन् सोन्या-चांदीचे दागिने लंपास; चोरट्याविरुद्ध इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल

Wednesday, 14 October 2026, 22:21

अन् मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या नगरसेवकांना झाप-झाप झापलं! देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर; म्हणाले “मी सगळ्यांचं रिपोर्टकार्ड…

Wednesday, 14 October 2026, 19:53

जिच्यावर विश्वास ठेवला तिनेच दिला धोका! पुण्यात घरकाम करण्याऱ्या महिलेचा कारनामा; संधी साधत कपाटातून..

Wednesday, 14 October 2026, 19:39

अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर! पदोन्नती प्रक्रियेतला अडथळा झाला दूर; ‘ती’ अट झाली रद्द

Wednesday, 14 October 2026, 19:35

पुणे जिल्ह्यातून बाहेर चारा नेण्यास सक्त मनाई! दुष्काळामुळे जिल्हा प्रशासनाचा मोठा आणि कडक निर्णय

Wednesday, 14 October 2026, 19:27
Next Post

दिवाळीपूर्वी अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा होणार २ हजार रुपये! राज्य सरकारची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp