Land Department : पुणे : राज्यातील वाढते शहरीकरण, गावठाण विस्तार आणि भूमापनाच्या प्रलंबित कामांचा ताण लक्षात घेऊन महसूल विभागाने भूमी अभिलेख विभागात मोठी प्रशासकीय पुनर्रचना केली आहे. लोकाभिमुख आणि जलद सेवा देण्यासाठी राज्यभरात तब्बल ५० नवीन कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. Land Department

भूमी अभिलेख विभागातील वाढत्या कामकाजामुळे शासनाने ११ मार्च २०२६ रोजी १० हजार ६८३ पदांच्या सुधारित आकृतिबंधाला मंजुरी दिली होती. आता त्या निर्णयाला प्रत्यक्ष स्वरूप देत नवीन कार्यालयांची स्थापना, कार्यक्षेत्र आणि मुख्यालय निश्चित करण्यात आले आहेत. Land Department

या नव्या रचनेत उपसंचालक भूमी अभिलेख यांचे १, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांची ८, नगर भूमापन अधिकाऱ्यांची २३ आणि विशेष उप अधीक्षक भूमी अभिलेख यांची १७ कार्यालये नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. नांदेड येथे उपसंचालकांचे कार्यालय असणार असून पुणे, नागपूर, नाशिक, रायगड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कार्यालये कार्यरत राहतील. Land Department
शहरी भागातील वाढत्या मालमत्ता मोजणी आणि भूमापन कामांना गती देण्यासाठी पुणे, नागपूर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, सातारा, जालना, लातूर, बीड, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये नवीन नगर भूमापन कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. Land Department
तसेच गावठाण, शहरमापन आणि नगर भूमापनाच्या वाढत्या ताणामुळे आणखी १७ नवीन कार्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील अशा कार्यालयांची संख्या आता ३४ वर पोहोचणार आहे. विशेषतः अमरावती आणि नाशिक विभागात नव्या कार्यालयांची संख्या अधिक असणार आहे. Land Department
दरम्यान, राज्यातील नागरिकांची मोजणी, हद्द निश्चिती, मालमत्ता चौकशी आणि नगर भूमापनाची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. Land Department







