रेल्वेत नोकरीचे (Railway Jobs) स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक (Job Hiring) मोठी आणि आनंदाची बातमी आहे. उत्तर मध्य रेल्वेमध्ये तब्बल 1,763 अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रयागराज येथील रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) मार्फत ही भरती होत असून, 10 वी उत्तीर्ण किंवा आयटीआय धारक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.

इच्छुक उमेदवारांनी rrcpryj.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. ही भरती उत्तर मध्य रेल्वेच्या विविध विभागांतील अप्रेंटिस पदांसाठी आहे आणि रेल्वे क्षेत्रात स्थिर करिअर शोधणाऱ्यांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे.

आवश्यक पात्रता
या पदांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डाकडून दहावी (SSC) किंवा समकक्ष परीक्षा किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
16 सप्टेंबर 2025 रोजी अर्जदाराचे वय किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षांपर्यंत असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारच्या नियमांनुसार सवलत मिळेल. अनुसूचित जाती व जमातींना 5 वर्षे, ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे, तर दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
अर्ज शुल्क
सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. मात्र SC, ST, महिला, ट्रान्सजेंडर आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. सर्व शुल्काची भरपाई ऑनलाइन पद्धतीने करावी लागेल.
अर्ज प्रक्रिया
1. उमेदवारांनी rrcpryj.org या संकेतस्थळावर लॉग इन करावे.
2. Act Apprentice Recruitment 2025 या लिंकवर क्लिक करावे.
3. अर्ज फॉर्म नीट भरून आवश्यक कागदपत्रे – शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो व स्वाक्षरी अपलोड करावी.
4. शुल्क भरल्यानंतर सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करावा.
5. शेवटी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.
रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही एक दुर्मिळ संधी आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब न करता तात्काळ अर्ज करावेत, कारण ही भरती केवळ नोकरी नाही, तर सरकारी सेवेत स्थिर भविष्याची दारे उघडणारी संधी आहे.







