पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुंबईतील एका संस्थेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

CSIR – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, मुंबई येथे प्रोजेक्ट असोसिएट – I या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 25000 रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रोजेक्ट असोसिएट – I.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. सागरी विज्ञान किंवा सागरी रसायनशास्त्रात.
– वेतन / मानधन : स्टायपेंड 25000 रुपये
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 एप्रिल 2025.
– अर्ज पाठवण्याचा ई- मेल आयडी : hrdg@nio.res.in
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://www.nio.org/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.







