निसर्गात अनेक असे झाडे, फळे आहेत त्याचे फायदेही आहेत. त्यात मोहाची फुले अत्यंत गुणकारी अशी ठरत आहेत. मोहाचे झाड केवळ पोषणच पुरवत नाही, तर पारंपारिक औषध म्हणून काम करते. यामध्ये ग्लुकोजसारखी शक्ती आणि मिठाईसारखी चव असली तरीही ते आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते. मोहाची फुले सुवासिक आणि गोड असतात, त्यात साखरेचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे ताजे खाल्ल्यास त्याची चव मिठाईसारखी लागते.
मोहामध्ये दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. मोहाची फुले ही औषधी गुणधर्मांचा स्रोत देखील आहेत. सर्दी, खोकला यांसारख्या श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास ही फुले ऊर्जा वाढवण्यास मदत करतात. वाळलेली फुले भिजवून, बारीक करून बांधून ठेवल्याने सूज, वेदना आणि मुरगळणे यापासून आराम मिळतो. या मोहाच्या झाडाची लागवडही केली जाते. विशेषत: भारताच्या मध्य आणि उत्तर भागात या मोहाची झाडे आढळून येतात. यातील पिकलेल्या फळांचा काही भाग चवीला गोड असतो.
मोहाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात तेल असते ज्याचे अनेक उपयोग आहेत. मार्च ते एप्रिल या कालावधीत दिसणारी मोहाची फुले पारंपारिकपणे गायी आणि म्हशींना चारण्यासाठी वापरली जातात. ज्यामुळे दूध उत्पादन वाढते. याशिवाय ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेल्या या फुलांचा वापर करून ‘महुआ लिकर’ देखील तयारी केली जाते. दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट असल्याने त्याचा वापरही केला जात आहे.