पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपल्या शरीरासाठी प्रथिने, व्हिटॅमिन्स यांसारख्या घटकांची गरज असते. Vitamin C च्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यात हाडे ठिसूळ होऊ शकतात. Vitamin C मुळे त्वचेला चमक तर मिळतेच पण त्याचबरोबर शरीरात रक्त तयार होण्यासही मदत होते. याशिवाय, हाडे मजबूतही होऊ शकतात.
शरीराच्या वाढीसाठी व्हिटॅमिन्स खूप महत्वाचे असतात. जेव्हा-जेव्हा Vitamin C चा विचार केला जातो तेव्हा त्वचेला चमक तर मिळतेच पण त्याचबरोबर शरीरात रक्त तयार होते आणि हाडे मजबूत होतात. Vitamin C च्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. Vitamin C च्या कमतरतेमुळे सांधेदुखी वाढते. जेव्हा शरीरातील Vitamin C ची पातळी कमी होते, तेव्हा सांध्यातील वेदना आणि सूज वाढते. सांधेदुखी कमी करण्यासाठी Vitamin C आहारात समावेश करावा. लिंबूवर्गीय फळांचे सेवन Vitamin C साठी फायदेशीर आहे.
Vitamin C च्या कमतरतेमुळे शरीरात ॲनिमिया होतो. रक्ताच्या कमतरतेला ॲनिमिया म्हणतात. Vitamin C शरीरात लोहाचे शोषण करण्यास मदत करते. परंतु जेव्हा शरीरातील Vitamin C चे प्रमाण कमी होते, तेव्हा लोह देखील कमी होऊ लागते, ज्यामुळे शरीरात अशक्तपणा येतो. जेव्हा शरीरात Vitamin C ची कमतरता असते तेव्हा जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. जखमा बऱ्या होण्यासाठी जास्त वेळ लागतो.