मुंबई: जगभरातील (Madhuri Dixit Statement) चाहत्यांना तिच्या दिलखेचक अदांनी वेड लावणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यामुळे पुन्हा एकदा अभिनेत्री राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, सर्व चर्चांदरम्यान, माधुरी दीक्षितने या विषयी भाष्य करत अखेरचे मौन सोडले आहे.

माधुरीने राजकारणाचा मार्ग स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. तिने ठामपणे सांगितले की, तिचे मुख्य उद्दिष्ट फक्त कलाकार म्हणून राहणे हा आहे. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यानही माधुरी दीक्षित राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. परंतु अखेर अभिनेत्रीने राजकारणाच्या रिंगणात उतरणार नसल्याने स्पष्टच सांगितले आहे.
“राजकारणाच्या दिशेने जाणं हे माझं कधीच उद्दिष्ट नव्हतं,” असे तिने पुढे स्पष्ट केले. “मी राजकारणासाठी स्वतःला योग्य मानत नाही,” असे मत तिने व्यक्त केले. “जे काम मी करते ते माझ्यासाठी राजकारणापेक्षा खूप महत्त्वाचे आहे,” असे ती म्हणाली.
कामाबद्दल बोलायचे झाल्यास माधुरी लवकरच ‘मिसेस देशपांडे’ या वेब सीरिजद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.







