Pune News: पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सुरु असताना पुणे जिल्ह्यात सत्ताधारी महायुतीच्या स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnvis) यांनी पुण्याच्या विकासासाठी घोषणा केली. जिजामाता विद्यालयाच्या मैदानात आज भाजपचा प्रचार करण्यात आला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी तरुणांसाठई रोजगारनिर्मिती वाढवण्याच्या दृष्टीने औद्योगिक वसाहती (MIDC) वेगाने विकसित करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा- Pune News: नोकरी मिळाली! आनंदाने कामावर गेले, पण समोर आले ‘ते’ भयानक सत्य; पुण्यात नेमकं काय घडलं?
प्रचारादरम्यान त्यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण करण्यासाठी एमआयडीसी संदर्भातील बैठक उद्याच्या अधिवेशनात घेतली जाईल. त्यांनी संग्राम थोपटे यांच्या पुढाकाराचे कौतुक करत, त्यांच्या सर्व संकल्पना आणि विकास योजनांना सरकारकडून आवश्यक पाठबळ दिले जाईल, असे स्पष्ट केले.
या सभेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, संग्राम थोपटे, स्वरूप थोपटे, शेखर वढने, स्नेहल दगडे, योगस तिलेकर, संजय जगताप यांच्यासह अनेक उमेदवारांनी उपस्थितीती दाखवली. तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करुन देऊ असं सांगताच, भाजपकडून कौतुकाचे वर्षाव होत आहे.
पुढे ते म्हणाले, आम्ही फक्त भाषण करणारे नाहीत, जे बोलोत ते प्रत्यक्षात करून दाखवलो. रोजगारासाठी एमआयडीसी ची एकही इंच जमीन वाया जाणार नाही. थोपटे यांनी मांडलेल्या विकास योजनांसाठी निधीची कमतरता भासणार नाही.







