पुणे : सध्याच्या काळात एक किंवा दोन आठवड्यातच चित्रपटांची क्रेझ ओसरू लागले. पण ‘कांतारा’ला याला अपवाद ठरला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा चित्रपट नॉन-स्टॉप कमाई करत आहे. रिलीजच्या सुरुवातीच्या दिवसांत चित्रपटाची कमाई खूपच कमी होती, मात्र हळूहळू वर्ड ऑफ माउथने चित्रपटाच्या कमाईला गती मिळू लागली. मूळात कन्नड भाषेत बनलेल्या या चित्रपटाची क्रेझ बघता निर्मात्यांनी 14 ऑक्टोबर रोजी तो हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये रिलीज केला.
कांतारा रिलीज होऊन 50 दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र त्याच्या कमाईचा ओघ सुरूच आहे. या चित्रपटाने नुकतेच जगभरात 400 कोटींचे कलेक्शन केले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाचे लेटेस्ट कलेक्शन शेअर करताना ही माहिती दिली आहे.
‘कांतारा’ या चित्रपटाने जगभरात 400 कोटींचा टप्पा पार ओलांडून इतिहास रचला आहे. एकट्या कर्नाटकात या चित्रपटाने 168 कोटींची कमाई करून KGF-2 लाही मागे टाकले आहे. लो बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाची कमाई पाहून चित्रपट पंडितांपासून सामान्य प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले आहेत. चित्रपटाची कमाई अशीच वाढत राहिली तर लवकरच तो रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र आणि कमल हासन यांच्या विक्रमच्या लाइफटाइम बिझनेसला मागे टाकेल.
कंतारा आता कमल हासनच्या विक्रमच्या कलेक्शनला मागे टाकण्यापासून काही पावले दूर आहे. कांताराचे कलेक्शन असेच वाढत राहिल्यास ते लवकरच विक्रम (414 कोटी) आणि ब्रह्मास्त्र (431 कोटी) यांना मागे टाकेल.कमाईच्या बाबतीत ‘कांतारा’ या वर्षातील सहावा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.