मुंबई : अभिनेत्री हिना खानला स्टेज 3 स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले आहे. कॅन्सरचं निदान झाल्यापासून हिना जास्तीतजास्त पॉझिटीव्ह राहण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या आजाराला आणि त्यावर घेत असलेल्या उपचाराना ती अगदी हसून सामोरी जात आहे.

सोशल मीडियावर तिने रॅम्प वॉकचा व्हिडीओ शेअर केला असून त्याला कॅप्शन दिलं की,” माझे बाबा नेहमी म्हणायचे कि, तू माझी स्ट्रॉग मुलगी आहेस. कधीच रडू नकोस. तुझ्या अडचणींविषयी कधीच तक्रार करू नकोस. तुझ्या आयुष्याचा कंट्रोल तुझ्या हातात घे. खंबीरपणे उभी राहा आणि त्याचा सामना कर. म्हणूनच मी पुढे काय होणार आहे याचा विचार करणं सोडून दिलं. मी फक्त यावर लक्ष दिलं कि मला काय करता येईल बाकी सगळं देवावर सोडून दिलं. तो तुमचे प्रयत्न बघतोय. त्याला तुमच्या प्रार्थना समजतात आणि त्याला तुमचं मन माहिती आहे. हे सतत मी स्वतःला सांगत असते. हिना पुढे चालत राहा. कधीच थांबू नकोस.”
अभिनेत्रीच्या ह्या नववधूच्या लूकवर रुबिना दिलैक, सुरभी ज्योती, शोभा देवी, मोना सिंग, लता सबेरवाल सह अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी हिनावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 5 लाखांहून अधिक युजर्सने हिनाच्या ह्या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
दरम्यान, हिना खान ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षराच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचली. ‘बिग बॉस’च्या 11 व्या सीझनमध्ये ती टॉप 2 मध्ये पोहोचली होती. ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्येही ती सहभागी झाली होती. काही म्युझिक व्हिडिओंमध्येही ती झळकली आहे.







