Film News मुंबई : लोकप्रिय टीव्ही शो ‘कोण होणार करोडपती’ सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात मराठी टेलिव्हिजनवर जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर बाप लेकीची जोडी पहिल्यांदा एकत्र आली आहे. ‘कोण होणार करोडपती’ मध्ये शनिवामिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबईसाठी खेळणार आहेत. ते स्वतः मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष आहेत. (Film News)

कॉमेडीच्या भविष्यासाठी त्यांनी ‘कोण होणार करोडपती’च्या खेळात सहभागी झाले आहेत. या पर्वातील हा विशेष भाग ठरला आहे. या भागात जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांच्याशी गप्पा चांगल्याच रंगल्या. बाप लेकीची ही जोडी पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजनवर एकत्र आली आहे.

त्यांच्यासोबत व्हीआयपी, नवीन प्रभाकर, नितीन भांडारकर आणि दिवेश शिवणकर हे विनोदी कलाकार देखील यावेळी कोण होणार करोडपतीच्या मंचावर आले होते. या विनोदवीरांच्या येण्याने ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर हास्याचे तूफान आले होते. त्याव्यतिरिक्त जॉनी लिव्हर यांच्या येण्याने एक वेगळीच एनर्जी पाहायला मिळाली.
जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांच्या सोबतच सचिन खेडेकर यांच्या विशेष गप्पा रंगल्या. नवीन प्रभाकर, व्हीआयपी, नितीन भांडारकर आणि दिवेश शिवणकर या कलाकारांचे विशेष परफॉर्मन्स ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर पाहायला मिळाले. जॉनी लिव्हर मंचावर असणार आणि धमाल होणार नाही हे शक्यच नाही. अशीच धमाल या एपिसोडमध्ये रंगली होती .







