Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; देवही दारू पितात तर भिमा कोरेगाव येथील शौर्य दिनाबद्दल म्हणाली की…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 3 January 2023, 12:23

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वामध्ये नेहमीच आपल्या परखड, आक्रमक स्वभावामुळे आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री केतकी चितळे ही नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. २०२२ मध्ये केतकीच्या वादग्रस्त पोस्टमुळे तिला जेलमध्ये जावे लागले होते. त्यानंतर संपूर्ण वर्षभर केतकी प्रचंड चर्चेत होती.

केतकीला काही महिन्याआधीच तिच्या फेसबुकचे अक्सेस परत देण्यात आले. त्यानंतर केतकी सोशल मीडियावर प्रामुख्याने फेसबुकवर सक्रीय झाली. केतकीच्या सोशल मीडिया पोस्ट पुन्हा चर्चेत येऊ लागल्या.

दरम्यान ३१ डिसेंबरला केतकीने शेअर केलेल्या व्हिडीओनं पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. केतकी नेटकऱ्यांच्या पुन्हा निशाण्यावर आली आहे. तर नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला केतकीनं उत्तर देखील दिली आहे.

 

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen)

केतकीनं फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात तिच्या हातात दारूचा ग्लास दिसत आहे. ग्लास हातात घेऊन केतकी सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देताना दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करत केतकीनं एक पोस्ट लिहिली आहे.

ज्यात तिने म्हटलय, ‘फादर त्या सगळ्यांना माफ करा. कारण त्यांना माहिती नाहीये ते काय करत आहेत. ती काही चुकीचे बोलत असेन तर मला नक्की सांगा. मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकीन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १०० % गलत है. सगळ्यांना माफ करा पण कधी विसरू नका’

केतकीचा दारू पितानाचा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले. केतकीला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. एका युझरनं म्हटलं, ‘वाह दीदी… लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका आणि आपण ढोसायचं’. या युझरला उत्तर देत केतकीनं वादग्रस्त्र विधान केलं आहे.

तिने म्हटलय, ‘मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका? सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देवही दारू पितात. काली मातेला तर दारूचे नैवेद्य असते. तसंच काही शंकाराच्या मंदिरातही. स्वत:ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते आणि सांगते. फरक शिका’.

केतकीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक लढाईची आठवण म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या शौर्यदिनाच्या निमित्ताने तिने कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनाबद्दल काहीही पोस्ट न टाकल्यामूळे तिच्यावर टिका करण्यात आली आहे.

तिच्या व्हिडिओला एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं होतं की ,“तमाम भारतीयांना भिमा कोरेगाव शौर्य दिनी शुभेच्छा द्याल असे वाटले होते. तुमच्याकडून आजचा दिवस दुर्लक्षित होणे अनपेक्षित आहे”या कमेंटवर केतकी भडकली आणि तिने त्या कमेंटवर खोचक प्रतिक्रिया दिली.

केतकी कमेंट करत म्हणाली, “भिमा कोरेगाव म्हणजे तीच जागा जिथे ब्रिटिश सैन्यातील तुकडी पेशव्यांच्या विरोधात लढली?! ब्रिटिश सरकारच्या बाजूने मराठा सैन्याविरुद्ध लढणाऱ्या लोकांना मी शुभेच्छा देण्याची तुम्ही अपेक्षा ठेवता म्हणजे एक तर तुम्हाला मी राष्ट्रद्रोही (धर्मद्रोही) वाटते, किंवा तुम्हाला खरा इतिहास माहिती नाही. यातील नेमके काय?” केतकीच्या या प्रतिक्रियेमुळे तिच्यावर पुन्हा टिका होत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केतकी चितळे ४१ दिवस तुरुंगात होती. तिची ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या विरोधात अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटक झाल्यानंतरही ती तिच्या भूमिकेवर ठाम होती. तिने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिलेल्या मुलाखतींमध्येही तिच्यासह घडलेला प्रकार बेयादेशीर होता असे म्हटले आहे. तरी अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर केतकीने पोस्ट डिलिट करण्यास नकार दिला होता. आणि आजही तिच्या फेसबुक अकाऊंटवर ती पोस्ट पाहायला मिळतेय.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Breaking News : व्हॉट्सअपमधून रिमुव्ह" केल्याने गृहनिर्माण सोसायटीच्या महिला अध्यक्ष व त्यांच्या पतीला बेदम मारहाण; मारहाणीत पतीची जीभ कापली गेल्याचा अध्यक्षाचा आरोप, पुण्याजवळील फुरसुंगी येथील घटना..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.