Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुलात नववर्षाच्या पूर्व संध्येच्या निमित्ताने ३० व ३१ डिसेंबरला ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे आयोजन…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 29 December 2022, 10:25

विशाल कदम

लोणी काळभोर : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारत तर्फे शुक्रवार, दि. ३० व शनिवार, दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.१५ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत विश्वशांती गुरुकुल, विश्वराजबाग, लोणी काळभोर (ता. हवेली) येथे ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन दिवस साजरा होणार्‍या ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. ३० डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता सुप्रसिध्द सूरबहार वादक पुष्पराज कोष्टी यांच्या शुभ हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. यावेळी माईर्स एमआयटी पुणेचे अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड व कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड देखील उपस्थित राहतील.

 

अत्यंत निसर्गरम्य व सुंदर अशा परिसरात होणार्‍या या संगीत महोत्सवामध्ये कामिका दत्ता, विनय मुंढे, श्रेयसी पावगी, पं. उद्धवबापू आपेगांवकर, पं.सूर्यकांत गायकवाड, पं. तेजस उपाध्ये, श्रीमती गोदावरीताई मुंडे व पं.उपेंद्र भट तसेच एमआयटी विश्वशांती संगीत कला अकादमीचे आजी माजी विद्यार्थी आपली कला सादर करतील. या कार्यक्रमाची सुरुवात तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने होईल.

भारतीय संस्कृती व परंपरेनुसार चैत्र शुध्द प्रतिपदा ‘गुढी पाडवा’ हाच खर्‍या अर्थाने नववर्ष दिन म्हणून ओळखला जातो. तथापि, ३१ डिसेंबरचा दिवस हा नववर्ष दिनाची पूर्वसंध्या म्हणून वेगळ्याच पाश्चात्य स्वरूपातील जल्लोषात भारतात व जगभरात साजरा केला जातो. परंतु, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि विश्वशांती संगीत कला अकादमी, पुणे या संस्थेच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण समाजामध्ये व विशेष करून तरूण वर्गाच्या मनामध्ये ‘स्वधर्म, स्वाभिमान व स्वत्व’ जागवून खर्‍या अर्थाने ‘भारतीय अस्मिता’ जागविण्याचा संस्थेचा एक विनम्र प्रयत्न आहे. ‘एमआयटी सांस्कृतिक संध्येच्या’ कार्यक्रमातून ‘संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन व शांत रसाची अनुभूती’ देणारा एक आगळावेगळा अलौकिक आविष्कार सर्व जाणकार रसिकांना मंत्रमुग्ध करेल.

दरम्यान, विश्वशांती गुरुकुल येथील विश्वराज बंधार्‍याच्या विस्तीर्ण जलाशयात उभारलेल्या मंदिर स्वरूपी श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी व श्री महाजलदेवता या तीन विशेष मंचावरून शांतरसाची अनुभूती देणारा ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ विशेष कार्यक्रम दरवर्षी ३० व ३१ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

दि. १ जानेवारी १९२३ रोजी सुरू होणार्‍या नव्या वर्षाची ही अभिनव सुरूवात भारतीय संस्कृतीला अनुसरून नामवंत, तसेच तरुण गायक व संगीतकार यांच्या सादरीकरणातून होणार आहे. एमआयटी सांस्कृतिक संध्येचा समारोप दि.३१ डिसेंबरच्या मध्यरात्री, त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्प सारख्या दुर्गुणांची आहुती देऊन, स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे पुढील २०२३ हे वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे यासाठी प्रार्थना करून संकल्प सोडला जाईल. हया अनोख्या संगीत समारोहाची सुरूवात २००७ साली करण्यात आली होते. एमआयटी संगीत संस्थेचे यंदाचे हे १५ वे वर्ष आहे.

या सांस्कृतिक संध्येच्या कार्यक्रमात सहभागी होऊन नादब्रह्मस्वरूपी ‘संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन व शांत रसाची अनुभूती’ घ्यावयाची असेल, त्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे विनम्र आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अशी माहिती विश्वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका ज्योती ढाकणे, डॉ. सुनिता कराड आणि महासचिव आदिनाथ मंगेशकर यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातुन पाणी नेण्याचा प्रकल्प तातडीने हाती घ्यावा - आमदार राहुल कुल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.