Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MIT College News : एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे संशोधक उद्याचा समर्थ भारत घडवतील ; पद्मश्री डॉ. प्रेम शंकर गोयल यांची अपेक्षा..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 11 August 2023, 20:00

लोणी काळभोर, (पुणे) : भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. परंतु गेल्या ७५ वर्षांत भारताने जी काही प्रगती केली त्यामागे विविध क्षेत्रातील संशोधकांचा मोठा हात आहे. भविष्यातही भारताला प्रगतीच्या वाटेने नेण्यासाठी संशोधकांची मोठी फौज लागणार आहे. याचीच जाणीव ठेवून एमआयटी-एडीटी विद्यापीठ आपल्याकडे नवनवीन संशोधक तयार करीत आहे. हे संशोधक निश्चितच उद्याचा भारत घडवतील, अशी अपेक्षा इस्त्रोचे माजी संचालक तथा पद्मश्री डॉ. प्रेम शंकर गोयल यांनी व्यक्त केली.

लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा आठवा वर्धापनदिन शुक्रवारी (ता. ११) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रेमशंकर गोयल बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माईर्स-एमआयटीचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून नॅशनल केमिकल लेबोरोटरीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आशीष लेले, मॅरेक्स मिडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. कमल चढ्ढा, डीन. सुदर्शन सानप, डीन मोहीत दुबे यांच्यासह सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समारंभाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अनोख्या डू-बाॅट मशीनच्या अनावरणाने करण्यात आले. या प्रसंगी एमआयटी-एटीडी विद्यापीठासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी प्रा. धीमंत पांचाळ यांना लाईफ टाईम अचिवमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. मोहित दुबे यांना लीडरशीप एक्सलंस अवॉर्ड देण्यात आला. याशिवाय विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

 

प्रा. डॉ. विश्वनाथ  कराड या वेळी म्हणाले की, विज्ञानाने मानवाच्या जीवनात मोठी प्रगती घडवून आणली आहे. परंतु आज जगभरात बोकाळलेली अशांती आणि हिंसाचार संपवायचा असेल तर विज्ञानाला आध्यात्माची जोड आवश्यक आहे. हीच गरज ओळखून आम्ही एमआयटी-एडीटीच्या भव्य आवारात विश्वशांती डोम निर्माण केला. याच आवारात आम्ही विज्ञान आणि आध्यात्माची सांगड घालणारी एक प्रयोगशाळादेखील स्थापित केली आहे. या विद्यापीठातून उच्चशिक्षित होऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या वैज्ञानिक व आध्यात्मिक ज्ञानाचा उपयोग विश्वाची प्रगती व शांततेसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी बोलताना डॉ. चढ्ढा म्हणाले की, आयुष्यात यश हे सातत्याने मिळवत राहिले पाहिजे. पहिल्या यशानंतर आपण थांबता कामा नये. असे झाल्यास कोणताही मनुष्य जीवनात सुखी होऊ शकत नाही. त्यामुळे यशाकडे विद्यार्थ्यांनी सातत्याने मार्गक्रमण करावे. आयुष्यात अनेक वादळे येतील परंतु प्रत्येक वादळांचा कठोरपणे मुकाबला करण्यासाठी स्वतःच्या व्यक्तिमत्वात लवचिकपणा आणा. यातूनच तुम्हाला यशाचा खरा मार्ग कळेल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24
Next Post

Daund News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार ; दोन वर्ष सुरू होता प्रकार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.