Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही, केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 18 January 2024, 22:37
Central Government guidelines for coaching classes announced

नवी दिल्ली : खासगी कोचिंग सेंटर्सच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही. तसेच रँक, गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देणे कोचिंग क्लासेसना महागात पडणार आहे. याबरोबरच आग प्रतिबंधक उपाययोजना करणे सर्व क्लासेस ना बंधनकारक असणार आहे.

केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार आता कुणालाही खासगी कोचिंग सेंटर उघडता येणार नाही. त्यासाठी सर्व प्रथम नोंदणी करावी लागेल. त्याशिवाय 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देता येणार नाही. कोचिंग सेंटर चालवणाऱ्यांना विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करता येणार नाही. नियमावलीतील व्याख्येनुसार 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण दिले जाते, त्या जागेला कोचिंग क्लास समजले जाईल.

केंद्र सरकारकडून कठोर नियम –

गेल्या काही दिवसांपासून NEET अथवा JEE ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. त्याशिवाय खासगी कोचिंग क्लासमध्ये मनमानी फी देखील आकारली जाते. त्यामुळेच या सर्वांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार, आयआयटी जेईई, एमबीबीएस, नीट यासारख्या प्रोफेशनल कोर्साठी कोचिंग सेंटरमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय सुरक्षासंदर्भात एनओसी असणंही बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षा आणि त्याच्या निकालाच्या दबावाशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित धडे आणि पाठबळ द्यावे, असेही नियमांत म्हटले आहे.

नियम मोडल्यास आर्थिक दंड –

कोचिंग सेंटर्सने केंद्र सरकारच्या नियमांनुसार नोंदणी करणं अनिवार्य आहे. त्याशिवाय इतर सर्व नियमांचं पालनही करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देणे कोचिंग क्लासेसना महागात पडणार आहे. कोचिंग क्लासेसने नियम मोडल्यास आर्थिक दंडाचा सामना करावा लागणार आहे. कोचिंग सेंटरकडून नियमांचे एकदा उल्लंघन झाल्यास पंचवीस हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. जर पुन्हा नियमांचं उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. जर त्यानंतरही नियम पाळले गेले नाहीत तर कोचिंग क्लासेसची मान्यता रद्द होऊ शकते.

नव्या नियमांनुसार, एखाद्या कोर्सदरम्यान कोचिंग सेंटरला मधेच फी वाढवता येणार नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याने पूर्ण पैसे भरूनही कोर्स अर्धवट सोडण्यासाठी अर्ज केला, तर कोर्सच्या उर्वरित कालावधीचे पैसे परत करावे लागतील. होस्टेल आणि मेस फी देखील परताव्यात समाविष्ट केली जाईल. दहा दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना रक्कम माघारी करावी लागेल.

पाच तासांपेक्षा जास्त क्लास नाही

शाळा, कॉलेज किंवा एखाद्या संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेळेत कोणत्याही परिस्थितीत कोचिंग क्लासेस घेण्यात येणार नाहीत. त्याशिवाय एका दिवसांत पाच तासांपेक्षा जास्त क्लास चालणार नाही. सकाळी लवकर आणि रात्री उशिरा क्लासेस घेता येणार नाहीत. विद्यार्थी आणि शिक्षकांना साप्ताहिक सुट्टी द्यावी लागेल.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

अन् त्यानं विवाहित प्रेयसीवर सपासप वार केले! संबंध ठेवायला नकार देताच बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; आईसमोरच प्रेयसीला संपवलं….

Monday, 16 November 2026, 14:34

PMP चालकाने अचानक ब्रेक दाबला; सर्व प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले अन् महिलेचे ५ दात तुटले, नेमकं काय घडलं?

Monday, 16 November 2026, 14:30

पद नाही तर काम नाही! तक्रारवाडीतील गावपुढाऱ्यांची सध्याची अवस्था; गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणार कोण?

Monday, 16 November 2026, 14:04

विद्यार्थ्यांचा जीवघेणा होडी प्रवास थांबणार! निमसाखर-बांगर्डे पुलासाठी 25 कोटी मंजूर; दत्तात्रय भरणेंच्या पाठपुराव्याला यश

Monday, 16 November 2026, 13:25

भाडेकरूंची मनमानी थांबणार; घरमालकांना पोलिसांचा आधार! मुदत संपल्यानंतरही घराचा ताबा न देणाऱ्यांवर कारवाईचा मार्ग मोकळा

Monday, 16 November 2026, 13:20

माणुसकीला काळिमा! इंदापुरात नवजात बाळाला ओढ्याजवळ सोडले; सतर्क नागरिकामुळे वाचला जीव

Monday, 16 November 2026, 13:11
Next Post
wife beats husband in chhatrapati Samabhajinagar

चाकण: चालकाच्या निष्काळजीपणामुळे रिक्षा पलटी; प्रवासी महिला जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp