पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमत वाढल्या असून, ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. आज सोन्याची किंमत लाखाच्या घरात येऊन पोहचली आहे. तर लग्नसराईच्या या दिवसात सोन्याच्या किंमतीत चढ-उतार दिसून येत आहेत. अशातच जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा सोन्याचा भाव काय आहे? हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे ठरेल.

आज, (14 जून ) 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,02,240 रुपये आहे आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 93,720 रुपये आहे. दिल्लीत, 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 99,463 रुपये आहे. तर मुंबईत, 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 98,440 रुपये आहे.
पुण्यात सोन्याचा भाव काय ?

पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 10,141 आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 9,296 आहे. तर 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 7,606 आहे.
10 ग्रॅम सोन्याचा भाव काय?
-24 कॅरेट सोने – 1,01,410 रुपये.
-22 कॅरेट सोने – 92,960 रुपये.
-18 कॅरेट सोने – 76,060 रुपये.







