Petrol Diesel Price : पुणे, : देशभरात वाढत्या महागाईने आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना आणखी एक आर्थिक झटका बसला आहे. आजपासून (१५ मे २०२६) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांहून अधिक वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Petrol Diesel Price

इंधन महागल्याचा थेट परिणाम आता जीवनावश्यक वस्तूंवर दिसून येणार आहे. विशेषतः डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतुकीचा खर्च वाढणार असून भाजीपाला, दूध, फळे, धान्य यांसारख्या रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या मते, वाहतूक खर्च वाढल्याने बाजारातील दर ५ ते १० टक्क्यांनी वाढू शकतात. Petrol Diesel Price

दरम्यान, रोज दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गालाही या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. पेट्रोलच्या वाढलेल्या दरामुळे महिन्याच्या इंधन खर्चात ५०० ते १५०० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. याशिवाय रिक्षा, टॅक्सी तसेच खासगी बससेवेच्या भाड्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. एसटी किंवा सार्वजनिक वाहतुकीच्या दरवाढीचाही भार नागरिकांवर पडू शकतो. Petrol Diesel Price
महागाईमुळे घरगुती खर्च वाढत असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बचतीवर परिणाम होणार आहे. आपत्कालीन निधी किंवा गुंतवणुकीसाठी राखून ठेवलेली रक्कम आता वाढत्या खर्चासाठी वापरण्याची वेळ अनेकांवर येऊ शकते. Petrol Diesel Price
मुंबईत पेट्रोलच्या दरात ३.१४ रुपयांची वाढ होऊन दर १०६.६८ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. तर डिझेल ३.११ रुपयांनी महागून ९३.१४ रुपये प्रति लिटर झाले आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १०७.९३ रुपये तर डिझेल ९४.४१ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. पुणे, ठाणे, सोलापूर, संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, नागपूर आणि परभणीसह राज्यातील अनेक शहरांमध्ये इंधन दरवाढीची नोंद झाली आहे. Petrol Diesel Price
दरम्यान, या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मासिक आर्थिक गणित पुन्हा एकदा विस्कळीत झाले असून, येत्या काही दिवसांत महागाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Petrol Diesel Price







