Saturday, August 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat Crime News : पत्नी दुसऱ्यासोबत राहायला गेल्याचा राग अनावर! बोरीभडक येथे दगडाने ठेचून पत्नीचा खून, यवत पोलिसांकडून आरोपी पतीला बेडया

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 8 August 2026, 16:18

यवत : पत्नी दुसऱ्या तरुणासोबत राहण्यास गेल्याच्या रागातून पतीने विवाहितेचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील बोरीभडक (ता. दौंड) गावच्या हद्दीत शुक्रवारी (ता. 07) संध्याकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी यवत पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.

शंकर बकस सिंग (वय 22, मूळ रा. खवपूर, ता. मोहम्मदपूर, जि. अमेठी, राज्य – उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तर आचल यादव (वय -18) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत रोहन मच्छिंद्र गवळी, वय 22 वर्ष, व्यवसाय मजुरी (सुनिल अरोरा यांचे कुरकुरे कंपनी) सध्या रा. पाईप कारखानाजवळ, तुषार चौधरी यांचे भाडयाचे खोलीत, नायगाव, ता. हवेली जि. पुणे मुळ रा. सारनी, ता. औसा जि. लातुर) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आचल यादव हिचे आरोपी शंकर सिंग याच्याशी लग्न झाले होते. मात्र, कौटुंबिक वादानंतर आचल ही पतीला सोडून फिर्यादी रोहन गवळी याच्यासोबत राहू लागली होती. याच गोष्टीचा राग धरून आरोपी शंकर सिंग याने शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बोरीभडक (ता. दौंड) गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर हायवेवरील सोलापूरकडे जाणाऱ्या लेनपासून 150 मीटर अंतरावर असलेल्या एका मोकळ्या जागेत आचलला गाठले.

तेथे आरोपी शंकर सिंग याने आचल यादव हिला गाठून अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या शंकरने जवळच पडलेला मोठा दगड आचलच्या डोक्यात घातला. दगडाच्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने 18 वर्षीय आचल हिचा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने जागीच मृत्यू झाला.

 

दरम्यान, या प्रकरणी रोहन मच्छिंद्र गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून यवत पोलिसांनी आरोपी शंकर सिंग याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला बुधवार (ता. 12) पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर माने या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शरद पवारांचे ८ खासदार सोमवारी थेट पंतप्रधान मोदींच्या भेटीला; दिल्लीत पडद्यामागे मोठी हालचाल?

Saturday, 8 August 2026, 16:57

Yavat Crime News : पत्नी दुसऱ्यासोबत राहायला गेल्याचा राग अनावर! बोरीभडक येथे दगडाने ठेचून पत्नीचा खून, यवत पोलिसांकडून आरोपी पतीला बेडया

Saturday, 8 August 2026, 16:18

सिद्धिविनायक मंदिर घोटाळ्याची आता थेट चौकशी! मुख्यमंत्र्यांचा आदेश; ‘त्या’ प्रकरणातील सगळं सत्य बाहेर येणार?

Saturday, 8 August 2026, 15:53

Pune News: खऱ्या जवानासमोर खोटं नाटक पडलं महागात! मृत सैनिकाचं आयकार्ड दाखवून शिवत होता गणवेश, असा झाला भांडाफोड

Saturday, 8 August 2026, 15:26

सोन्याच्या दरात मोठी उसळी! प्रति तोळा तब्बल हजारोंची वाढ; 24K, 22K सोन्याचे ताजे दर जाणून घ्या

Saturday, 8 August 2026, 15:18

NEET घोटाळ्यात महाराष्ट्रातील 3 तज्ज्ञांचा हात? CBI आरोपपत्रातून धक्कादायक कनेक्शन उघड

Saturday, 8 August 2026, 14:56
Next Post

शरद पवारांचे ८ खासदार सोमवारी थेट पंतप्रधान मोदींच्या भेटीला; दिल्लीत पडद्यामागे मोठी हालचाल?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.