Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मालमत्तेसाठी वाट्‍टेल ते…! मुलाने व नातवाने आपल्या आजीचे मालमत्तेसाठी केले तुकडे ; क्राईम पेट्रोल आणि ‘दृश्यम’ चित्रपट पाहून मुंढव्यातील एका राजकीय पदाधिकाऱ्याने रचला खुनाचा कट…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 7 September 2022, 10:55

पुणे : मालमत्तेच्या हव्यासापोटी सख्ख्या वृद्ध आजीला नातवाने इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने शरीराचे तुकडे करून ते नदीत फेकून दिल्याची दृदयद्रावक घटना पुण्यात घडली आहे. बापलेकांनी हा खून क्राईम पेट्रोल आणि ‘दृश्यम’ चित्रपट पाहून केला असून बाप-लेकाला मुंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

उषा विठ्ठल गायकवाड (वय ६२, रा. म्हसोबानगर, केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्या वृद्ध आजीचे नाव आहे. याप्रकरणी साहिल ऊर्फ गुड्डू संदीप गायकवाड (वय-२०), संदीप विठ्ठल गायकवाड (वय-४२, रा. दोघेही म्हसोबानगर, केशवनगर, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा गायकवाड या देहुरोड येथील शासकीय कार्यालयात माळीकाम करत होत्या. तर आरोपीचे वडीलही वानवडी परीसरातील शासकीय कार्यालयात माळीकाम करत होते. या कामातुन मिळणाऱ्या पैशातुन पिडीत महिलेने आपल्या मुळाबाळासाठी मुंढवा परीसरात दिड गुंठे जागा खऱेदी करुन, त्या जागेवर घऱ बांधले होते. पिडीत महिलेला तीन मुली व दोन मुले असा परीवार होता. तिन दोनपैकी एक मुलगा शिरुरला राहत असुन, धाकटा मुलगा म्हणजेच या प्रकरणातील संशयित आरोपी मुंढवा येथे रहण्यास आहे. तो एका मोठ्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी असुन, त्याची दोन लग्ने झालेली आहेत. दरम्यान नवऱ्याच्या मृत्युनंतर पिडीत महिला एकटीच त्या घरात रहात होती. हे घर खाली करावे यासाठी मागिल कांही दिवसापासुन, पिडीतेचा मुलगा संदीप गायकवाड व त्याचे कटुंबिय पिडीत महिलेला त्रास देत होते.

 

दरम्यान ऑगष्ट महिण्याच्या पहिल्या आठड्यात घऱ खाली करावे यासाठी मुलगा व त्याचे कुटुंबिय मारहान करत असल्याची तक्रार पिडीत महिलेने आपल्या तीनपैकी मधल्या मुलीकडे केली होती. या तक्रारीची खातरजमा करण्याच्या उद्देशने पिडीत महिलेची मुलगी पाच ऑगष्ट रोजी घरी आली असता, घरात आई नसल्याचे मुलीला आढळुन आले. याबाबत पिडीत महिलेच्या मुलीने आईबाबत भावाकडे व त्याच्या वीस वर्षीय मुलाकडे चौकशी केली असता, दोघांनीही दमदाटी करुन मुलीला व तिच्या नवऱ्याला हाकलुन दिले. मात्र घरातुन बाहेर पडतांना घऱात मोठ्या प्रमानात रक्त सांडल्याचे दिसुन आल्याने मुलीला काही तरी काळेबेरे घडल्याची शंका मनात आली.

दरम्यान मनात आलेल्या शंका निरसण करण्यासाठी पिडीत महिलेच्या मुलीने नातेवाईक व घराजवळच्या लोकांच्याकडे अधिक चौकशी केली वरी धक्कादायक प्रकरणाचे धागेदोरे मुलीच्या हाती लागले. यावरुन संबधित मुलीने मुंढवा पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासात मुलाने आपल्याच साठ वर्षीय जन्मदात्या आईचा खुन करुन तिच्या मृतदेहाचे तब्बल नऊ तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला.

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने मुंढवा पोलिसात वडिलांना सोबत घेऊन आजी बेपत्ता झाल्याची तक्रारदेखील दिली. मात्र पोलिसांनी जेव्हा घरी जाऊन पाहिले तेव्हा उषा यांची चप्पल आणि काठी बाहेर मिळून आली. उषा यांना पायाचा आजार असल्याने चालता येत नव्हते तेथूनच पोलिसांनी तपासाला गती दिली पोलिस आपल्या घरच्या लोकांकडे चौकशी करतील म्हणून त्याने सुरुवातीपासूनच त्यांना पोलिसांना कशी उत्तरे द्यायची हे सांगितले होते..

आईने घऱ खाली करावे या किरकोळ कारणासाठी आईचा खुन करणारा मुलगा व त्याच्या वीस वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आईच्या मृतदेहाच्या नऊ तुकड्यापैकी कांही तुकडे विविध ठिकाणाहुन पिशवीसह ताब्यात घेतले आहेत. तर उर्वरीत तुकडे शोधण्याचे काम युध्दपातळीवर चालु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत येथील सेवारस्ता झाला जलमय ; प्रशासनाचे दुर्लक्ष तर स्थानिकांना नाहक त्रास!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.