Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पोलिसांचा धाक खरंच उरलाय का..? मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या साउंडवर कारवाई करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला टोळक्यांकडून धक्काबुक्की ; ५ जणांना बेड्या, खडकी भागातील संतापजनक प्रकार..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 4 January 2023, 13:58

पुणे : “आम्ही कोण आहोत, याची माहिती तुम्हाला नाही. पोलीस आम्हाला काही करू शकणार नाहीत,” असे म्हणून मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या साउंडवर कारवाई करायला गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की केल्याची घटना खडकी परिसरात घडली असून यात पाच जणांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे.

मार्केट यार्ड परिसरात एकाने सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार उघडकीस आला असल्याने आता पुणे पोलिसांचा धाक राहिला नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या प्रकरणात सुमित सुभाष मिश्रा (वय २०), रसल एल्वीस जॉर्ज (वय २७), ऋषभ अशोक पिल्ले, निशांत संजय गायकवाड (वय २३), सिद्धार्थ महादेव लोहान (वय २४, सर्व रा. मुळा रस्ता, खडकी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळा रस्त्यावरील त्यागी बंगला परिसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास साउंडवर मोठ्या आवाजात गाणी लावून आरोपी नाचत होते. कोणती गाणी वाजवायची, या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू होता. साउंडचा आवाज ऐकून रात्रीच्या वेळी गस्त घालणारे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे, सहकारी पोलीस कर्मचारी जाधव तेथे गेले. त्यांनी साउंड बंद करा, असे सांगून कारवाई करण्यास सुरुवात केली.

तेव्हा आरोपींनी अरेरावी सुरू केली. “आम्ही कोण आहोत, याची माहिती तुम्हाला नाही. पोलीस आम्हाला काही करू शकणार नाहीत,” असे सांगून त्या मदमस्त आरोपींनी उपनिरीक्षक बेंदगुडे आणि जाधव यांना धक्काबुक्की केली. पोलिसांच्या वाहनाची चावी काढून घेतली. शासकीय कामात अडथळा आणणे तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम पुढील तपास करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13
Next Post

शिरूर तालुक्यात रब्बी कांदा पिकाची लागवड ; शिल्लक रोपांचा प्रश्न बिकट ; सोशल मीडियातून रोपाच्या विक्रीचा प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.