Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोलवडी येथील सागर भालसिंग या तरुणाच्या सतर्कतेमुळे विमाननगर येथील २५ वर्षीय तरुणीचे वाचले प्राण ; कोलवडी-थेऊर येथील मुळा मुठा नदीच्या पुलावरून उडी मारून करणार होती आत्महत्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 5 October 2022, 17:26

लोणी काळभोर : कोलवडी-थेऊर येथील मुळा मुठा नदीच्या पुलावरून उडी मारून आज बुधवारी (ता.५) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीचे कोलवडी (ता. हवेली) येथील सागर भालसिंग या तरुणाच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले आहे. लोणी कंद पोलिसांनी तरुणीला सुखरूप तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलवडी-थेऊर येथील मुळा मुठा नदीच्या पुलाजवळ आज बुधवारी दुपारी साडे बारा ते दिड वाजण्याच्या सुमारास एक २५ वर्षीय तरुणी दुचाकीवरून आली होती. तिच्याजवळ एक मोबाईल फोनसुद्धा होता. तिने दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावली. आणि नदीच्या पात्राजवळ फिरत होती. सदर तरुणी चिंताग्रस्त वाटत होती. आणि नदीच्या पात्रातील पाणी पाहून परत रोडच्या कडेला कोलवडी गावाकडे येत जात होती.

हि बाब लोणी कंद पोलिस ठाण्याचे पोलीस मित्र सागर भालसिंग यांच्या निदर्शनास आली. तेव्हा भालसिंग यांनी तरुणीला बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु ती बोलत नव्हती. व तेथे येण्याच थांबण्याच कारण देखील सांगत नव्हती. दरम्यान या काळात तरुणीला अचानक चक्कर आली. आणि तरुणी रस्त्यावर पडली. त्यानंतर सागर भालसिंग यांनी तरुणीला तत्काळ कोलवडी येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

 

दरम्यान, तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिला लोणी कंद पोलिसांनी केसनंद पोलिस चौकीत आणले. तेव्हा ती विमानगर येथील असल्याची माहिती मिळाली. आणि ती आत्महत्या करण्यासाठी आली असल्याचे स्पष्ठ झाले. त्यानंतर पोलिसांनी तरुणीचे मनपरिवर्तन करून तिला तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्त केले.

याबाबत बोलताना  सागर भालसिंग म्हणाले कि, विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर माझ्याकडून एका आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या तरुणीचे प्राण वाचले आहे. यामुळे मला पोलीस मित्र म्हणून काम करण्यास अधिक प्रेरणा मिळेल. माझ्याकडून अशीच देशाची, राष्ट्राची व समाजाची सेवा घडो. अशी मी ईश्वराकडे प्राथर्ना करतो.

लोणी कंद पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे म्हणाले, मुलांनो नैराश्यातून आत्महत्येकडे वळू नका. जिवन हे अनमोल आहे. परिस्थितीला सामोरे जा. आणि जर काही अडचण येत असेल तर तुमच्या मदतीला महाराष्ट्र पोलीस सदैव २४ तास मदतीला तत्पर आहेत. तुम्ही फक्त एक कॉल करा तुमची अडचण नक्की सोडविली जाईल. रागाच्या भरात असे निर्णय घेऊ नका.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

पुणे जिल्हा परिषदेतही आता 'वॉररूम'कक्ष ; जिल्हातील विविध योजनांच्या अंमलबजावणीवर असणार लक्ष...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.