Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रखवालदारच निघाला चोर; सिंहगड रस्त्यावर रखवालदाराकडून 8.65 लाख रुपयांचा ऐवज चोरी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 24 August 2025, 14:20

 पुणे: सिंहगड रस्त्यावरील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून तब्बल 8 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची घटना उघड झाली होती. या प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांनी सोसायटीतच काम करणाऱ्या रखवालदारालाच अटक केली.

अटक करण्यात आलेल्या रखवालदाराचे नाव राकेशकुमार मूलचंद सोनी (वय 29, रा. राम अमिलिया, जि. अनुपपूर, मध्य प्रदेश) असे आहे. सोनी हा सिंहगड रस्त्यावरील गणेश मळा परिसरातील एका सोसायटीत रखवालदार म्हणून काम करत होता.

8 ऑगस्ट रोजी तक्रारदार हे बाहेरगावी गेले असता, रखवालदार सोनी याने त्यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून 10 तोळे सोन्याचे दागिने, किंमत 8 लाख 65 हजार रुपये, असा ऐवज लांबविला होता. 12 ऑगस्ट रोजी तक्रारदार परतल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीनुसार, चोरट्याने शयनगृहातील कपाट फोडून दागिने चोरले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. सोसायटीच्या सीसीटीव्ही चित्रीकरणासह घरकाम करणारे, रहिवाशी आणि रखवालदारांची चौकशी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार रखवालदार सोनी याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 8 लाख 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले.

 

ही कारवाई परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, तसेच पोलीस कर्मचारी प्रकाश मरगजे, अमोल दबडे, महेश मंडलिक, अमित चिव्हे, सूर्या जाधव, श्रीकांत शिंदे, सद्दाम शेख, मनोज बनसोड, नानासाहेब खाडे आणि राकेश सुर्वे यांनी सहभाग घेतला.

शहरातील अनेक सोसायटींमध्ये रखवालदार काम करतात. परंतु त्यांना कामावर ठेवण्यापूर्वी पोलिस पडताळणी करणे बंधनकारक आहे. त्यांचे नाव, पत्ता आणि चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र न घेता रखवालदार नेमू नये, अशा स्पष्ट सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. मात्र अनेक सोसायट्यांमध्ये या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळेच रखवालदारांकडून घरफोडी किंवा फसवणुकीच्या घटना घडत आहेत. हडपसरमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक आणि ओंढ भागातील बंगल्यातील लाखो रुपयांचा ऐवज चोरल्याचे प्रकरण यापूर्वी घडले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी आवर्तन नाही; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे संकट

Wednesday, 21 October 2026, 23:19

यंदा किती दिवस असणार दिवाळीच्या सुट्ट्या? दिवाळी सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी; जाणून घ्या सविस्तर…

Wednesday, 21 October 2026, 22:56

लाडक्या बहिणींनो देवभाऊ तुमच्यासाठी घेऊन येणार आणखी एक योजना! कोण-कोण घेऊ शकणार लाभ? जाणून घ्या सविस्तर

Wednesday, 21 October 2026, 20:33

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! स्थानकांवरील किराणा स्टॉलवर चहा, कॉफी आणि शिजवलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी

Wednesday, 21 October 2026, 20:26

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली काळे धंदे! सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कोंढवा-येवलेवाडीत पोलिसांच्या धाडसी कारवाईत २ महिलांची सुटका

Wednesday, 21 October 2026, 20:23

वर्दीमागचा त्याग; हुतात्म्यांना सलाम! २१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन; कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे स्मरण

Wednesday, 21 October 2026, 19:45
Next Post

'पुण्यातील वाहतूक कोंडीला नेतेच जबाबदार' पुण्यात ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर राज ठाकरेंचा तीव्र संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp