Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Solapur Crime : नात्याला काळीमा फासणारी घटना..!! शेतजमीन नावावर न केल्याच्या रागातून चुलत्याने केली ४ वर्षीय चिमुकल्या पुतणीची हत्या ; मोहोळ तालुक्यातील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 21 February 2023, 17:31

सोलापूर : जमिनीच्या वादातून सख्या चुलत्याने “तुमचा वंशजच शिल्लक ठेवत नाही”, अशी धमकी देत ४ वर्षीय चिमुकल्या पुतणीचं तोंड आणि नाक दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. २०) सकाळी पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास डिकसळ (ता. मोहोळ) येथे घडली आहे.

ज्ञानदा यशोधन धावणे (वय -४ वर्षे, रा. डीकसळ, ता. मोहोळ) असे मयत चिमुकलीचे नाव आहे. यशोदीप शिवाजी धावणे (वय – ३२) असे आरोपी चुलत्याचे नाव आहे. याप्रकरणी यशोधन शिवाजी धावणे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोधन शिवाजी धावणे हे शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांची गावाच्या कडेला एकूण १६ एकर जमीन आहे. त्यापैकी स्वत: यशोधन यांच्या नावावर पाच एकर आणि भाऊ यशोदीप याच्या नावावर पाच एकर व राहिलेली सहा एकर शेतजमीन आईच्या नावावर आहे. भाऊ यशोदीप हा गेल्या तीन वर्षांपासून आईच्या नावावर असलेली सहा एकर जमीन स्वतःच्या नावावर खरेदी करून देण्यासाठी घरातील सर्व लोकांना त्रास देत होता.

 

गावातील प्रतिष्ठित लोकांनी व नातेवाईकांनी त्याला वेळोवेळी बैठक बसवून “तुमचे आई वडील असेपर्यंत त्यांच्या नावावर राहू दे. नंतर ते सहा एकर तुम्हा दोघं भावांच्याच नावावर होणार आहे आणि आम्ही करून देऊ”, असे गावातील प्रतिष्ठित लोकांनी वेळोवेळी सांगून देखील यशोदीपच्या मनात राग होता.

सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास यथोधन, पत्नी योगीता आणि आई हे शेतातील कामे करण्यासाठी शेतात गेले. त्यावेळी यशोधन यांची मुलगी घरात झोपलेली होती. शेतातील काम करून सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास यशोधन घरी आले असता त्यांना त्यांची मुलगी घरात दिसली नाही. तेव्हा यशोधन यांनी सर्वांना फोन करुन चौकशी केली असता ती कुठेही दिसून आली नाही.

यशोधन यांनी भाऊ यशोदीप याला फोन लावून “मुलगी घरात नाही. कुठे आहेस तू मुलीला पाहिलस का?, असं विचारले असता त्याने “मी तुझ्या मुलीला ठार मारून मलिकपेठ येथील सिना नदीपात्रात पाण्यात टाकून दिले”, असे सांगितले. घाबरलेल्या बापाने दुचाकीवरुन मलिकपेठ गाठत सिना नदीचे पुलावरून नदीत पाहिले असता मुलगी पाण्यावर तरंगत दिसली.

तिचा मृतदेह मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणला असता तपासुन डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. मोहोळ पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवून यशोदीपला ताब्यात घेतले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकरानेच केला प्रेयसीचा विनयभंग ; प्रेयसीच्या आईच्या पोटात मारली लाथ ; तिघांवर गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.