Pune News : पुणे : सासू-सुनांची भांडणे नवीन नाहीत. भांडणासाठी कोणतेही कारण पुरेसे असते. मात्र, या सासू-सुनांमध्ये भांडण होण्याचे कारण देखील तसेच होते. सासूने सुनेला उद्देश्यून नकटी असे संबोधन केले. यामुळे संतप्त झालेल्या सुनेने थेट स्वयंपाक घरातील सुरीने सासूच्या हातावर सपासप वार केल्याची घटना येरवडा परिसरात घडली.
सुनेविरुद्ध गुन्हा दाखल
येरवडा पोलिसांनी याप्रकरणी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संध्या अशोक मगर (वय ४५, रा. गणेशनगर, येरवडा) असे गुन्हा दाखल केलेल्या सुनेचे नाव आहे. (Pune News ) याबाबत सासू मालनबाई परशुराम मगर (वय ७५) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सासूबाई आणि सूनबाई घरात काम करत असताना दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यावरून संध्या सासूला नकटी असे म्हणाली. त्यानंतर सासू मालनबाई ‘तूसुद्धा नकटी आहे’, असे तिला म्हणाल्या. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. संध्याचा राग अनावर झाला. (Pune News ) त्याचे रागाने संध्याने स्वयंपाक घरातील सुरीने सासूच्या हातावर सपासप वार केला. यामुळे सासूबाईंच्या हाताला दुखापत झाली.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार देसाई करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू..