Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : इंजेक्शन देण्यासाठी गळ्याभोवती पट्टा आवळला अन् श्वानाचा गुदमरून मृत्यू झाला… दोन डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 23 November 2023, 14:33

Pune News : पुणे : वार्षिक लसीकरणासाठी क्लिनिकमध्ये आणलेल्या हनी नावाच्या एका श्वानाला इंजेक्शन देण्यासाठी त्याच्या गळ्याभोवती पट्टा बांधला. हा पट्टा घट्ट झाल्याने त्याचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाषाण येथील विगल्स माय पेट क्लिनिकमध्ये १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बाणेर पाषाण लिंक रोडवरील एका ३५ वर्षांच्या महिलेने याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डॉ. संजीव राजाध्यक्ष (वय ६०), डॉ. शुभम राजपुत (वय ३५) आणि त्यांच्या दोन सहायकांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेकडे ‘हनी’ नावाचा लॅब्रोडर जातीचा श्वान होता. वार्षिक लसीकरण आणि नेल ट्रिमिंगसाटी ही महिला श्वानाला घेऊन पाषाण परिसरातील विगल्स माय पेट क्लिनिकमध्ये १७ नोव्हेंबर रोजी आली होती. दरम्यान, तिने हनीला डॉक्टरांच्या ताब्यात दिले. डॉ. राजपूत आणि त्यांचे दोन सहकारी त्यांच्याकडील पट्टयाने हनीला झाडाला बांधण्यासाठी प्रयत्न करत होते. त्या वेळी श्वानाला बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पट्ट्याचा गळफास बसला. गळफास घट्ट झाल्याने श्वान जागीच कोसळला. डॉक्टरांनी श्वानावर तत्काळ उपचार सुरू केले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही.

 

दरम्यान, या घटनेनंतर १५ मिनिटांनी डॉक्टरांनी फिर्यादी महिलेला हनीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही डॉक्टर श्वानाच्या मृत्यूबाबत काहीही न बोलता तेथून निघून गेले. संबंधित महिलेसह कुटुंबाला या श्वानाचा लळा लागला होता. श्वान ४० दिवसांचा असल्यापासून तो १२ वर्षांचा होईपर्यंत त्यांच्या कुटुंबात मोठा झाला होता. श्वानाच्या मृत्युमुळे दुखावलेल्या महिलेने चतुःश्रृंगी पोलिसांत धाव घेतली. श्वानाचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी डॉक्टरांविरूद्ध गुन्हा दाखल केला. चतु:शृंगी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
Raju shetti agiatation for sugarcane FRP in kolhapur

Raju Shetti: अंबाबाईचे आशीर्वाद घेऊन राजू शेट्टींचा पुणे-बंगळूर महामार्गावर एल्गार; आंदोलकांची धरपकड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.