Pune firing पुणे, ता. 29 : देहूरोड परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. भाजपशी संबंधित असलेल्या एका कार्यकर्त्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली असून, यात रमेश रेड्डी यांचा मृत्यू झाला आहे. Pune firing

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी रमेश रेड्डी यांना लक्ष्य करत सलग गोळीबार केला. त्यातील एक गोळी त्यांच्या डोक्यात लागल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने देहूरोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. Pune firing
या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. संतप्त नातेवाईक व समर्थकांनी रुग्णालयात आक्रोश करत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आला. गोळीबाराच्या घटनेची बातमी पसरताच देहूरोड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दुकाने बंद ठेवली. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. Pune firing
दरम्यान, हल्लेखोर कोण होते आणि या हल्ल्यामागील नेमका हेतू काय, याचा तपास पिंपरी-चिंचवड पोलीस करत असून, या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.







