Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : परदेशी विद्यार्थिनीसोबत डिलिव्हरी बॉयचं अश्लील वर्तन; धक्कादायक म्हणजे घटना दडपण्याचाही झाला प्रयत्न?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 29 March 2026, 8:50
Pune

photo- ai

Pune : विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री एका परदेशी विद्यार्थिनीच्या निवासस्थानी घुसून डिलिव्हरी बॉयने अश्लील वर्तन केल्याचा आरोप झाला असून, त्याहून धक्कादायक म्हणजे ही घटना दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोपही पुढे आले आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा ऑर्डर देण्याच्या बहाण्याने आलेल्या डिलिव्हरी बॉयने विद्यार्थिनींच्या खोलीसमोर अनुचित हालचाली केल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्वरित पोलिसांकडे नेण्याऐवजी काही संबंधितांनी “तक्रार देऊ नका” असा दबाव टाकल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनींकडून जबरदस्तीने लेखी निवेदन घेतल्याचेही समोर आले असून, हा मुद्दा विद्यापीठाच्या अधिसभेत गाजला.

या घटनेने विद्यापीठातील सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी उघड केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था असतानाही काही विद्यार्थिनींना प्राध्यापकांच्या निवास इमारतीत ठेवण्यात आले होते. या इमारतीत CCTV कॅमेरे नसणे, सुरक्षा रक्षकांची कमतरता अशा बाबी गंभीर ठरत आहेत. विशेषतः परदेशी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक संवेदनशील असताना अशा प्रकारची निष्काळजीपणा चिंताजनक आहे.

या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी 2 दिवसांत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अधिकृत पोलिस तक्रार दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

ही घटना केवळ एका विद्यार्थिनीपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेतील सुरक्षेच्या निकषांवर प्रश्न उपस्थित करते. विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी आणि विशेषतः महिला व परदेशी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस आणि तातडीचे पाऊल उचलणे आता अत्यावश्यक ठरले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

duaghter murdered her mother with help of friend pune

Pune Crime : दारूच्या वादातून मजुराचा दगडाने ठेचून खून, कोंढवा पोलिसांकडून आरोपी जेरबंद

Saturday, 2 May 2026, 13:53
two people detained for taking bribe in parbhnai

Akrudi Bribe : RTE प्रवेशासाठी ४० हजारांची लाच; एसीबीने खाजगी इसमाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले!

Saturday, 2 May 2026, 12:52

Pune police Bribe News : लोहगाव पोलिसांचा ‘लाचखोर’ चेहरा उघड ; ८० हजार घेताना उपनिरीक्षक रंगेहात जेरबंद!

Saturday, 2 May 2026, 11:41

Uruli Kanchan News : सोरतापवाडी येथील ‘शिव मोटर्स’च्या मालकाचा कार विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा ; कार ग्राहकाला दिली, पण मूळ मालकाने नेली पळवून..

Saturday, 2 May 2026, 11:22

Bhor News : नसरापूर थरारलं! वृद्धाकडून दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर निर्घृण खून; जिल्ह्यात संतापाची लाट

Saturday, 2 May 2026, 10:58

Maval News : जाधववाडी धरण व पवना नदीत बुडून ४ तरुणांचा मृत्यू, मावळात परिसरात शोककळा

Saturday, 2 May 2026, 10:40
Next Post
Crime

Crime : बनावट ग्राहक बनून पोलीस शिरले अन्... 'क्लिओ स्पा'वर पोलिसांची धाड,कोरेगाव पार्कात खळबळ!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.