Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : कुडजे गावातील ग्रामसेवकाचे सिनेस्टाईल अपहरण ; खंडणी घेत दिली संपूर्ण कुटुंबाला मारण्याची धमकी, दोघांना बेड्या…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 April 2023, 10:15

Pune Crime News | पुणे : ग्रामसेवकाचे सिनेस्टाईल अपहरण करत बंद असलेल्या हॉटेलमध्ये हातपाय बांधून ठेवले. विषारी औषध पाजण्याची धमकी देत गुगल पे ने ७३ हजार रुपयांची खंडणी उकळली. तसेच मोबाईल आणि कार बळजबरीने ताब्यात घेत आणखी दीड लाखांची मागणी केल्याची धक्कादायक घटना कुडजे (हवेली) गावच्या हद्दीत घडली आहे. एखाद्या सिनेमात घडवा असा प्रसंग घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ग्रामसेवक महेशकुमार खाडे असे ग्रामसेवकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विकास प्रकाश गायकवाड (वय ३८, रा. कुडजे, ता. हवेली जि. पुणे) व त्याच्या इतर दोन अज्ञात साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींपैकी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडजे गावातून गुरुवारी संध्याकाळी आपले कार्यालयीन कामकाज आवरून घरी चालले होते. यावेळी खाडे हे कुडजे गावच्या स्मशानभूमी जवळ आले असता दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी खाडे यांच्या चारचाकी समोर बियरची बाटली फोडली आणि खाडे यांची गाडी अडवली. हॉर्न का वाजवला याचे कारण काढून त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी खाडे यांना जबरदस्तीने एका हॉटेलवर नेले आणि त्यांचे हात पाय बांधून ठेवले.

 

त्यानंतर अपहरणकर्त्यांनी एक औषधाची बाटली दाखवत ‘आत्ताच्या आत्ता पैसे दे नाहीतर तुला हे औषध पाजून मारून टाकू’ अशी धमकी दिली. घाबरलेल्या खाडे यांनी स्वतःच्या खात्यात असलेले ४९ हजार रुपये व आपल्या मित्राकडून आणखी २४ हजार मागून एकूण ७३ हजार रुपये आरोपींना ऑनलाईन गुगल पे करून दिले.

आरोपींनी खाडे यांचा मोबाईल व कारची चावी काढून घेत, उद्या आणखी दीड लाख रुपये आणून दे नाहीतर तुझ्यासह संपूर्ण कुटुंबाला मारून टाकू’ अशी धमकी देखील दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणी उत्तम नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून विकास प्रकाश गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारी (मोक्का) अंतर्गत करण्यात यावी अशी मागणी पुणे जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत वाव्हळ यांनी केली आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Bhigwan Crime : संतापजनक ! माजी उपसरपंचासह दोघांनी अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार ! मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस

Daund Crime News : दौंड तालुक्यातील जावजीबुवाचीवाडी येथे रेल्वे रुळाजवळ काट्यांमध्ये आढळला मृतदेह ; परिसरात खळबळ..

Pune Crime : क्लिनिकमध्ये उपचारासाठी आलेल्या महिलेवर बलात्कार करणार्‍या डॉक्टराला ठोकल्या बेड्या…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post

Pune News : शिव ऋण युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे यांना जामीन मंजूर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.