Pune Crime News : पुणे : भारती विद्यापीठ परिसरात कौटुंबिक वादातून सुनेने आपल्या वृद्ध सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर सुनेने स्वयंपाकघरातील सुरीने सासूवर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली आहे. Pune Crime News

सुमन अण्णासाहेब शिंदे (वय ८२, रा. समृद्धी रेसीडन्सी, आंबेगाव बुद्रुक) असे मृत ज्येष्ठ महिलेचे नाव असून अनुपमा संजय शिंदे (वय ६०) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस शिपाई मल्लिकार्जुन कोळी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. Pune Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंब एकत्र राहत होते. अनुपमा शिंदे यांचे पती सेवानिवृत्त असून मुलगा खासगी नोकरी करतो. घरात सासू-सुनेमध्ये किरकोळ कारणांवरून नेहमी वाद होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. Pune Crime News
मंगळवारी दुपारी घरात अनुपमा आणि सुमन या दोघीच होत्या. दुपारी साडेएकच्या सुमारास दोघींमध्ये पुन्हा वाद झाला. संतापाच्या भरात अनुपमा यांनी स्वयंपाकघरातील धारदार सुरी उचलून सासू सुमन शिंदे यांच्यावर वार केले. घटनेनंतर त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले.Pune Crime News
दरम्यान, कुटुंबीयांना प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडला असता सुमन शिंदे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. Pune Crime News
दरम्यान, पोलिसांनी आरोपी अनुपमा शिंदे यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मिथून परदेशी करत आहेत. Pune Crime News







