(Pune Crime )पुणे : पुणे शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बहिणीकडे आलेल्या अल्वयीन मेव्हणीवर ४५ वर्षाच्या मेव्हण्याने बलात्कार व अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बहिणीच्या हा प्रकार लक्षात येताच तिने वाचा फोडली असता नराधाम दाजीचे कारनामे समोर आले. हा धक्कादायक प्रकार २५ मार्च २०२३ ते एप्रिल २०२३ दरम्यान घडला.
याप्रकरणी पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात पीडित १३ वर्षीय मुलीने फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून ४५ वर्षीय दाजीवर पोलीसांनी गुन्हा दाखल करत त्यास बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार…!
१३ वर्षीय पीडित मुलगी आपल्या मोठ्या बहिणीकडे तीन महिण्यापुर्वी रहावयास आली होती. यावेळी मोठी बहिण घरी नसताना मेव्हणीवर नराधाम दाजी अत्याचार करत होता. त्याने अनैसर्गिक अत्याचार सुद्धा केले. दरम्यान मुलिने हा सर्व घडलेला प्रकार आपल्या बहिणीला सांगितला. त्यानंतर घडलेला हा सर्व प्रकार समोर आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.